रामप्रभू

श्रीभावार्थ रामायण
कवी - श्रीएकनाथमहाराज
-------------
महाराजांनी मला अनुग्रह देण्यापूर्वीच मी या ग्रंथाचे वाचन सुरु केले होते. माझे उपास्यदैवत प्रभू रामचंद्र यांच्याविषयी ज्यांनी ज्यांनी ग्रंथ लिहिले ते वाचण्याचा छंद मला लागला होता. हा प्रचंड ग्रंथ वाचायला मला १ वर्ष ६ महिने लागले.
यामध्ये भाषेतील सर्व रस मला भरभरून आढळले. नाथांची विनयी, नम्र, मर्यादशील भावशैली मला अतिशय भावली.
या ग्रंथातील काही ठळक मला आवडलेले नाथांचे निरुपण देत आहे.

श्रीयोगवाशिष्ठ

--------------
संदर्भ - श्रीयोगवासिष्ठ - संपादक - डॉ. म.वि.गोखले. यशवंत प्रकाशन
-----------
या ग्रंथाची पर्यायी नावे
- आर्षरामायण
- उत्तररामायण
- वासिष्ठमहारामायण
- मोक्षोपायसंहिता
- बृहद्योगवासिष्ठ

प्रस्तावना
भारतीय लोकांनी श्रीरामकथेचा आश्रय करूनच वैयक्तिक आणि सामाजिक संकटांतून मार्ग काढलेला दिसतो.
श्रीमत्‌अध्यात्मरामायण ही मूळ वाल्मिकीरामायणाची अत्यंत सरस, संक्षिप्त आवृत्ती म्हणता येईल.
दैवी आणि मानवी अशा दोन्ही अंगांनी श्रीरामाचे चरित्र सांगितले आहे (वाल्मिकी रामायण).

Syndicate content