महाराजांवरचे लेखन व फोटो वेगळ्या लिंकखाली द्यायचे ठरवले, त्यामुळे पेजेस लावणे सोपे जाईल असे वाटले.
या लिंकखाली महाराज संदर्भात फोटोंचे अल्बम दिले आहेत.
१) मुखदर्शन फोटो - दिवस रात्र कधीही केव्हाही आपल्या सद्गुरुंचं दर्शन साधकाच्या मनाला उल्हास देतं, धीर देतं, शांत करतं. सद्गुरुंच्या डोळ्यांतील प्रेम करुणा आशीर्वादमय असते.
२) पूर्ण साईजचे फोटो - आपल्या सद्गुरुंच्या चरणकमलांचं दर्शन साधकाला नम्र ठेवतं व त्याला त्यांच्या कृपेचा लाभ होतो. या फोटोंमध्ये महाराजांचे चरण दिसत आहेत. कधी चपला कधी खडावा आहेत. हातात मात्र कायम माळ आहे. अंगावरचे कपडे बदलते आहेत. कधी भरजरी कपडे, गळ्यात माळा, गणेशटोपी, मुकुट, पायात जोडे, कफनी, फरगुल, तर कधी फक्त लंगोट. मुद्रा मात्र गंभीर, आत्मरत आणि निर्लेप.
३) गोंदवल्याला महिन्याचं कॅलेंडर मिळत असे त्यात ३१ फोटो व अलिकडे पलिकडे २ असे फोटो आहेत. सुरुवातीचे जास्तीत जास्त फोटो महाराजांचे आहेत. नंतर त्यांचे शिष्य, त्यांची द्वितीय पत्नी, गोंदवल्यातील मुर्तींचे फोटो आहेत.
४) महाराजांच्या चरित्राच्या पुस्तकातील बिनरंगीत चित्रे स्कॅन करुन त्याचा अल्बम दिला आहे.
॥श्रीराम समर्थ॥