आत्मोन्नती

२०११-
"माझी शोधयात्रा" या अंतर्गत मी काय काय घातले आहे ते पाहिले.

जे जे हाताशी तयार होतं ते ते त्या त्या वेळेला घातलं गेलं. नंतर मी अर्थातच ते पुस्तकातल्या चॅप्टर्सप्रमाणे लावत गेले, तरीही मी समाधानी नव्हते.

काल जेव्हा मी सगळी पाने चाळली तेव्हा असं वाटलं की ,"मी कोण?" हे ब्रह्मजिज्ञासेत येतं पण ती प्रथम पिंडजिज्ञासा असते. त्यानंतर ती "इतरांविषयीची (समाज) जिज्ञासा" असते. नंतर तिचा ब्रह्मजिज्ञासेपर्यंत प्रवास होतो.

त्यामुळे "पिंडजिज्ञासा", "समाजजिज्ञासा" असे दोन भाग घालावे असे वाटले.

॥श्रीराम समर्थ॥

Syndicate content