जीवात्मा

मी एक साधनी:
जीवात्मा अनेक जन्मात जी शरीरे मिळवतो त्याविषयी भगवंत काय सांगतात?

माझ्या मनातील सद्गुरु:
ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण-तारुण्य आणि वार्धक्य येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीरही मिळते.
या नाशरहित, मोजता न येणार्‍या, नित्यस्वरूप जीवात्म्याची ही शरीरे नाशिवंत आहेत.
शरीर मारले गेले तरी आत्मा मारला जात नाही.
ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसर्‍या शरीरात जातो.

मी एक साधनी:
जीवात्म्याला कोण जाणतो?

मी एक साधनी:
आत्मा-परमात्मा हे शब्द नेहमी वाचनात ऐकिवात असतात, त्यांचा अर्थ नेमका काय आहे? ते शब्द मला परके का वाटतात? जीवात्मा कसा असतो?
माझ्या मनातील सद्गुरु:
जीवात्मा कायम असतो.
हा अविनाशी आहे.
आत्मा कोणालाही मारत नाही आणि कोणाकडून मारला जात नाही.
आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही.
हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही, कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन, आणि प्राचीन आहे.
या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत.
विस्तव जाळू शकत नाही.
पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही.

Syndicate content