महाराज

महाराजांच्या निरुपणातील प्रमुख विषय
-----------------
संदर्भ - महाराज चरित्र -
--------------
श्री. के. वि बेलसरे यांनी महाराजांनी बोलताना- साधकांना मार्गदर्शन करताना जे विविध विषय हाताळले त्यांचे सुंदर संकलन केलेले आहे. त्यातील सार देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.

अनुसंधान

- सकाळ उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत "महाराज" सोडून मला दुसरा ध्यासच नसतो.
- प्रत्येक गोष्ट त्यांना सांगून करायची सवय लागलीय
- काही मनाविरुध्द झालं तरी यात माझं काहीतरी कल्याणच महाराज करीत आहेत असं वाटतं. माझ्यातलं दोषदर्शन होतं - मीपणा, लौकिकाची सूक्ष्म आस लक्षात येते.
- देहाला काही त्रास होत असला तरी रामनाम ऐकणं चालू राहतं, मनात मी म्हणतेय की नाही याच्याकडे मी लक्ष देत असते.

Syndicate content