शेवटची वासना- पुढची गती

मरताना जी वासना रहाते, त्याप्रमाणे जीवाला पुढची गती मिळते.

यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम्‌ ।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥

यम्‌ यम्‌ वः अपि स्मरन्‌ भावम्‌ त्यजन्ति अन्ते कलेवरम्‌ ।
तम्‌ तम्‌ एव इति कौन्तेय सदा तत्‌ भाव भावितः ।

कौन्तेय, वः अन्ते यम्‌ यम्‌ भावम्‌ स्मरन्‌ कलेवर
- हे कुन्तीपुत्र अर्जुना! हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, तो त्यालाच जाऊन मिळतो. कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो.

संदर्भ- श्रीमद्भगव‍त्‌गीता अध्याय- ८ अक्षरब्रह्मयोग, श्लोक - ६
----------------------------------------------------------------
अनुसंधान म्हणजे सतत एकाच विषयाचं रहाणारे स्मरण-चिंतन-ध्यास-निदिध्यास

एकच ध्यास ठेवल्यानं शरीर-मन-बुध्दी यांचा समन्वय होऊन त्या विषयाच्या अनुषंगानं इच्छा-भावना-विचार व कृती माणसाच्या हातून होते.
भक्त नेहमी भगवंताच्या अनुसंधानातच असतात. बाकी सर्वजण भगवंत सोडून इतर गोष्टींची आस-सोस-हव्यास धरतात. कशाचा ध्यास घेतला होता, कशाचं अनुसंधान राहिलं होतं त्याप्रमाणे अनुसंधानाचे परिणाम दिसतात.

॥श्रीराम समर्थ॥