भोगयोनी

भोगयोनी -

भोग भोगून संपवणे एवढेच काम या योनीत असते. या मध्ये देहधारणा -आहार-निद्रा-मैथुन-पुनरुत्पादन या व्यतिरिक्त मोक्षासाठी काही करता येत नाही. कोणतेही कर्म पाप-पुण्यामध्ये येत नाही. कारण कर्माचे स्वातंत्र या योनींमध्ये नसते.

---------------------------------------
पृथ्वीवर -
- विविध प्रकारचे कीटक
- विविध प्राकारचे जलचर
- विविध प्रकारचे चतुष्पाद
- विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी
- विविध प्रकारचे उभयचर
- विविध प्रकारच्या वनस्पती
तृण, वेली, झुडपे, वृक्ष, कंद
- पर्वत इ. स्थावर
-------------------
स्वर्गात -
पुण्याच्या संचयाप्रमाणे विविध प्रकारचे लोक जीवाला मिळतात. ते भोगून झाल्यावर जीवाला पुन्हा मृत्यूलोकात यावं लागतं.
----------------------
अंतरिक्षात -
भूत, पिशाच, पितृयोनी, यक्ष,
----------------------
मनुष्ययोनी ही एकमेव कर्मयोनी आहे. यात कर्माचे स्वातंत्र असते. केलेल्या कर्माचे पाप किंवा पुण्य असे फल मिळते. या योनीतच मोक्षासाठी प्रयत्न करता येतात.

॥श्रीराम समर्थ॥