शोकावर इलाज, स्वधर्मपालन,

मी एक साधनी:
भगवंत अर्जुनाच्या निमित्ताने कलियुगातील सज्जन माणसांना या शोकातून बाहेर येण्याचा मार्ग कसा दाखवतात?
माझ्या मनातील सद्गुरु:
भगवंत असं सांगत आहेत की, जन्माला आलेल्याला मृत्यू आहेच. आणि मेलेल्याला पुन्हा जन्म आहे. यावर कोणाचाही काही उपाय चालत नाही. त्यामुळे ज्यावर आपण कोणताही उपाय करू शकत नाही त्याचा शोक कशाला करायचा?

मी एक साधनी:
म्हणजे भगवंत अनिवार्य अशा पुनर्जन्माबद्दल स्वच्छपणे सांगत आहेत!
माझ्या मनातील सद्गुरु:
हो. ते आपल्याला सांगताहेत की, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यावरही अप्रकट होणार असतात. फक्त मध्ये प्रकट असतात. म्हणजे ते कोणत्याही वेळेला असतातच. (प्रकट किंवा अप्रकट). त्याच्या शरीरात असणारा आत्मा नेहमीच अवध्य असतो.

मी एक साधनी:
नेमकं काय करावं आणि करु नये हा जो संभ्रम मोहित माणसाला पडतो त्यावर भगवंत काय सांगतात?
माझ्या मनातील सद्गुरु:
माणसाने आपल्या धर्माला अनुसरुन कर्म करावे.
तसे जर त्याने केले नाही तर अपकीर्ति व पाप होते.
कोणत्याही सन्माननीय माणसाला अपकीर्ति मरणाहून दुःसह वाटते.
बलवंत, कीर्तिवंत, नीतिमान माणसाची प्रशंसा करणारी माणसं व त्याचे शत्रू दोन्ही त्याची निंदा करतात. अर्वाच्य बोलतात.
त्यामुळे आपले कर्तव्य माणसाने चोख करावे.
हे करताना मरण आले तरी कौतुक होते, यश मिळाले तरी कौतुक होते.

॥श्रीराम समर्थ॥