परमात्मा कसा आहे?

मी एक साधनी:
महाराज, या जगाचा निर्माता कसा आहे?

माझ्या मनातील सद्गुरु:
परमात्मा जाणण्यास योग्य आहे, परमात्म्याला जाणल्यावर मनुष्य परमानंद प्राप्त करुन घेतो.
परमात्मा अनादी आहे,
हे परब्रह्म सत्‌ ही नाही आणि असत्‌ही नाही.
हे परब्रह्म सर्व बाजूंनी हातपाय असणारे आहे,
ते सर्व बाजूंना डोळे असणारे आहे,
ते सर्व बाजूंना मुखे असणारे आहे,
ते सर्व बाजूंना कान असणारे आहे,
हे परब्रह्म सर्वांना व्यापून राहिले आहे.
परब्रह्म सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारे आहे,
ते सर्व इंद्रियांनी रहित आहे,
ते आसक्तीरहित आहे,
ते सर्वांचे धारण-पोषण करणारे आहे,
ते निर्गुण आहे,
ते गुणांचा भोग घेणारे आहे.
परब्रह्म ज्योतींची ज्योती आहे,
ते तमाच्या पलिकडे आहे,
ते ज्ञान आहे,
ते ज्ञानगम्य आहे,
ते सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहे.

॥श्रीराम समर्थ॥