नरक

नरक-कर्म-फळ - (संदर्भ- श्रीदेवी भागवत पुराण, पृष्ठे - ५२० ते ५२४, ६०२ ते ६१०)
नरक – याचे स्थान पृथ्वीच्या दक्षिणेला आहे व याचा स्वामी यमधर्म आहे. हा अष्टदिक्पालांपैकी एक आहे.
यमाचे वर्णन –
पितृराज यम पुरुषाचे जसे कर्म असेल त्या प्रमाणात विचारपूर्वक दंड करीत असतो.

त्याचे गण (यमदूत) त्याच्या आज्ञेचे पालन करणारे असतात.
यम हा अतिशय बुध्दिमान आहे.
तो कर्मफलाप्रमाणे दंड करुन त्या प्राण्यांना योग्य त्या प्रदेशात जाण्यास सांगतो.
त्याने एकूण २८ नरक निर्माण केलेले आहेत. शिवाय शाल्मली व वैतरणी या नद्याही निर्माण केलेल्या आहेत.
हे सर्व नरक म्हणजे ऐहिक स्वरुपात दुःख देणार्या यातनाच आहेत. हे सर्व त्या प्राण्यांच्या कर्मगतीप्रमाणे त्यांना प्रप्त होत असते.

यमदूतांचे वर्णन -
ते पाप्यांना क्लेश देतात.
ते कुंडांचे रक्षण करतात.
त्यांच्या हातात दंड, पाश, शक्ती, गदा, तलवारी असतात.
ते मदमत्त व तमोगुणयुक्त असून दयाशून्य असतात.
विविध रूपे धारण करणारे ते शूर असतात.
ते पाप्याला मृत्यूसमयी दिसतात.
हे दूत स्वधर्मतत्पर, विशाल ज्ञानी, निःशंक, अदृश्य व विष्णूभक्त असतात..

नरककुंडांची वर्णने –

१) तास्मित्र-
कर्म - दुसर्याची स्त्री, अपत्य, वित्त यांचे हरण करणे.
फळ यमदूत कालपाशांनी बद्ध करून यमयातना भोगायला लावतात, ते पाशांनी ताडन करतात, भयंकर दंड करतात, निर्भत्सना करतात.
२) अंधतास्मित्र
कर्म - परस्त्रीच्या पतीला फ़सवून त्याच्या स्त्रीचा उपभोग घेणे.
फळ - यमदूत नरकात लोटतात त्यामुळे अति वेदनांनी त्याला बेशुद्धी येते, दृष्टी क्षीण होते , बुद्धी नष्ट होते, त्याला निस्तेजता येते.
३) रौरव
कर्म - प्राण्यांची हिंसा (भूतांचा द्रोह) करणे, मी - माझेपण, कार्यलोलुपता, फ़क्त कुटुंबाचे पोषण.
फळ - ते प्राणी रूरू होऊन त्याला त्रस्त करतात.
४) महारौरव
कर्म - प्राण्यांची अघोरी हिंसा
फळ - क्रव्याद नावाचा रुरु (क्रूर प्राणी) त्या माणसाच्या देहाच्या मांसाचे लचके तोडतो.
५) कुंभीपाक
कर्म - क्रूर व उग्रपणे पशूपक्ष्यांना शिजवून खाणे.
फळ - मारलेल्या प्राण्यांचे जेवढे रोम तेवढी हजार वर्षे तापलेल्या तेलात यमदूत त्या पाप्याला तळतात.
६) कालसूत्र
कर्म - माता, पिता, सामान्य जन, ब्राह्मण, विद्वान यांच्याशी द्रोह करणे.
फळ - भुकेने व तहानेने आतून जळणे, उष्णतेमुळे बाहेरून तप्त होणे, प्रचंड कासाविशी, चेष्टा, अवहेलना.
७) असिपत्र
कर्म - संकट नसताना वेदोक्त मार्गापासून ढळणे.
फळ - यमदूत वाद्यांनी मार देतात, दोन्ही बाजूला धार असलेल्या पात्यांनी कापून काढतात, सर्वांगाचे तुकडे करतात, त्याला असह्य वेदना होतात, मूर्च्छा येते.
८) सूकरमुख
कर्म - राजा अथवा राजपुरुषाने अधममार्ग वापरून अयोग्य दंड (अन्याय) करणे, ब्राह्मण, तपस्वी इ. ना शरीरदंड भोगायला लावणे.
फळ - बलाढ्य यमदूत राजपुरुषाचे अवयव उसाप्रमाणे पिळून काढतात, त्याला मूर्च्छा येते, असह्य वेदना होतात, निश्चेष्टता येते.
९) अंधकूप
कर्म - दुसर्याचे (पशूपक्ष्यांचे) रक्तपान करणे, नित्य पीडा देणे.
फळ - भयंकर प्राणी अंधारात पीडा देतात, तो नंतर त्याच प्राण्यांसारख्या वाईट जन्माला जातो.
१०) कृमिभक्षण
कर्म - योग्य मार्गाने मिळवलेले धन व साहित्य इतरांना विभागून न देता स्वत:च हडप करणे.
फळ - यमदूत क्रूरपणे वागतात.
११) कृमिकुंड
कर्म - अतिथींना अन्न विभागून न देणे, भूतबळी न देता स्वत:च अन्न भक्षण करणे.
फळ - स्वत: कृमी होऊन स्वत:ला इतर कृमींकडून खाववतो.
१२) सदंश (वैतरणी)
कर्म राजे व राजाचे अधिकारी नास्तिकतेने नीतिनियमांचे उल्लंघन करतात.
फळ वैतरणी नदीत पडतात, भयंकर जलचर प्राणी दंश करतात, देहनाश होत नाही व प्राणही जात नाही, विष्ठा, मूत्र, पू, रक्त, केस, अस्थी, नखे, मांस, मेद, वसा यांनी ती नदी भरलेली असते.
१३) ?
कर्म व्याभिचारी पती, पशूवत् आचरण.
फळ श्लेष्मा व मलाच्या खड्ड्यातील मल खावा लागतो.
१४) वज्रकंटक
कर्म - नित्य मृगया (शिकार) करणे, कुत्री व गाढवांचे ब्राह्मण मालक, प्राण्यांची हिंसा करणे, धनसंचय करणे.
फळ - यमदूत तीक्ष्ण बाणांनी टोचतात.
१५) विशस
कर्म - अतिदांभिकपणा व अधमपने जे यज्ञात पशूहत्या करतात.
फळ - चाबकाच्या वाद्यांनी शरीरावर प्रहार करतात.
१६) रेतकुंड
कर्म - कामव्यथेने पीडित द्विजाने, सगोत्र स्त्रीबरोबर समागम करणे.
फळ - रेत पिववतात.
१७) सारमेयादन
कर्म - चोरी करणे, आग लावणे, विष घालणे, वाटमारी करणे, गावे लुटणे.
फळ - सातशेवीस कुत्रे सत्वर खातात.
१८) ?
कर्म संकटे नसताना चोरी करणे, सुवर्ण, धन, रत्ने यांचे हरण करणे.
फळ तप्त लोखंडाच्या गोळ्यांनी भाजून काढतात.
१९) ?
कर्म चांडाळ स्त्रीबरोबर गमन करणे, स्त्रीने अगम्य पुरुषसंबंध ठेवणे.
फळ चाबकाच्या वाद्यांनी मारतात, लोखंडाच्या जळजळीत पुतळ्याला आलिंगन देण्यास भाग पाडतात.
२०) अवीची
कर्म - खोटे बोलणे - साक्ष देताना, दान करताना, द्रव्य खर्च करताना.
फळ - उंच पर्वतशिखरावरून फ़ेकून देतात, उलटे लटकवून ठेवतात, सुळावर चढवितात.
२१) ?
कर्म सोमपान करणे.
फळ द्रवरूप पोलाद पाजतात, यातना भोगाव्याच लागतात.
२२) क्षारकर्दम
कर्म - ज्ञानी, तपस्वी, ज्येष्ठ, श्रेष्ठ यांना मान न देता स्वत:ला मोठा समजणे.
फळ - यमदूत उलटे लटकवून ठेवतात.
२३) ?
कर्म - नरमेधन व बली देणे, स्त्रियांनी नरपशू खाणे.
फळ - सर्व पशू एकत्र येतात व तलवारीने त्याचा देह विदीर्ण करतात, रक्त पितात, धुंद होऊन नाचतात.
२४) ?
कर्म निरपराध प्राण्यांचा विश्वासघात करने, प्राण्यांना फ़ासात पकडणे, गळ लावून प्राणी पकडणे.
फळ सुळाव्र चढवतात, अणकुचीदार चोचीचे पक्षी टोचत राहातात.
२५) दंदशूक
कर्म - प्राण्यांना त्रस्त करणे.
फळ - सात तोंडाचे वाघ ग्रासून टाकतात.
२६) ?
कर्म प्राण्यांना अंधार्या, अडचणीच्या जागी कोंडणे.
फळ धूर व विषारी वायूयुक्त ठिकाणी कोंडतात.
२७) वटारोध?
कर्म अतिथीकडे रागाने डोळे वटारून पाहाणे.
फळ वटपक्षी डोळे उपटतात.
२८) सूचिमुख
कर्म - संपत्तीमुळे माजणे, गर्विष्ठ होणे, संशयित नजरेने बघणे, द्रव्यप्राप्तीची चिंता करणे.
फळ - शरीरात सर्व बाजूंनी सूत ओवतात.