क्षेत्रपालपूजन

क्षेत्रपालपूजन
---------------
- प्रत्येक गाव हे क्षेत्र मानले जाते.
- त्या गावाचे रक्षण करणारा-करणारी-करणारे देव-देवता (ते दिसत नाहीत पण) असतात, त्यांना क्षेत्रपाल म्हणतात.
- याला वेदांत आधार आहे. प्रत्येक यज्ञकर्मात क्षेत्रपालपूजन हा विधी असतोच.
- क्षेत्रपालांची पंचोपचारांनी पूजा करतात.
- शिजवलेला भात, काळे उडीद, तूप, पायसम्‌, असे एका ताटात पत्रावळीत मांडून त्यावर उदबत्ती लावून तुपाचा दिवा लावून त्याचा नैवेद्य दाखवतात त्याला बली म्हणतात.
- हा बली यजमान व त्याचे कुटुंब यांच्यावरुन ओवाळून तो नंतर घराबाहेर, कुंपणाबाहेर झाडाखाली ठेवायला गुरुजी कोणाला तरी (घरातल्या सेवकाला) सांगतात.
- त्याच्यामागून पांढर्‍या मोहर्‍या जमिनीवर सांडत यजमान जातात, त्यांच्यामागून त्याची पत्नी पाणी सांडत जाते. घराच्या वेशीपर्यंत गेल्यावर यजमान व त्याची पत्नी बाहेर अंगणात थांबतात. त्यांच्या पायावर पाणी घरातले कोणी तरी घालते, दोघे डोळ्यांना पाणी लावतात, चूळ भरतात व हवनाचे पुढचे काम करायला दोघे आत येतात.

॥श्रीराम समर्थ॥