सर्व शांतींचा सर्वसामान्य विधी

सर्व शांतींचा सर्वसामान्य विधी
------------------------------------
- संकल्प
- गणपतीपूजन
- पुण्याहवाचन (वरुणपूजन, मातृकापूजन, नांदीश्राध्द, अभिषिंचन)
- गुरुजींना शांतिकर्म चालवण्यासाठी अधिकार (वर्ण) देणे
- शांतीच्या जागेची शुध्दी
- गुरुजी सूक्ते म्हणुन आपली देहशुध्दी करतात
- देवतास्थापना
- अग्निस्थापना
- देवतापूजन
- हवन
- यजमानासाठी (आयुष्य-वर्धनार्थ व आरोग्यासाठी) काही वैदिक मंत्र व सूक्ते म्हणणे,
- आहुती (स्विष्टकृत)
- प्रायश्चित्तहोम
- क्षेत्रपालबली
- शांतिसूक्त
- पूर्णाहूति
- होमाचे उत्तरांग
- स्थापितदेवतांची उत्तरपूजा
- यजमान व कुटुंबीयांवर अभिषिंचन
- नूतनवस्त्र परिधान करून अग्निदेवतेची प्रार्थना करून होमविभूति धारण करणे
- गुळ्तीळमिश्रित दूध पिणे
- काशाच्या पात्रात तूप वितळवून त्यात मुखावलोकन करणे
- गुरुजींना पीठदान व दशदाने देणे
- यजमानाच्या कुटुंबीयांनी यजमानाचा सन्मान करणे
- वयाच्या संख्येप्रमाणे दीप उजळून सुवासिनींनी औक्षण करणे
- शांतीसमाप्ति
- ब्राह्मणभोजन
- विडादक्षिणा
- गुरुजींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेणे
- ३ वेळा विष्णूस्मरण करून सर्व कर्म भगवंताला अर्पण करणे

॥श्रीराम समर्थ॥