९ सृष्टींची निर्मिती

९ सृष्टींची निर्मिती
[संदर्भ- श्रीविष्णूपुराण)
---------------------
सर्व सृष्टी ही ब्रह्मदेवाची कल्पना आहे (मानसप्रजा).
प्रत्यक्षात काहीच घडले नाही, घडत नाही. जी घडामोड दिसते तो माया या परब्रह्माच्या एका शक्तीचा विलास आहे.
-------------------------------------
ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्याचा विचार करीत असता
१) प्राकृत सृष्टी - तम, मोह, महामोह, तमिस्र आणि अंधतमिस्र ही तमोमय सृष्टी (५ प्रकारची अविद्या) निर्माण झाली.
२) प्राकृत सृष्टी - स्थावर सृष्टी - जिला स्वतःविषयीचे अथवा शब्दादी बाह्य विषयांचे आणि सुखादिक आंतर विषयांचे ज्ञान नाही अशी...वृक्ष-वेली, डोंगर, दगड, नद्या, तळी, सागर, इ. (हे पुरुषार्थ साधक नाहीत - यांना मोक्ष नाही)
३) प्राकृत सृष्टी - तिर्यक स्रोत ही सृष्टी - (पशु, पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी, जलचर इ.) (हे पुरुषार्थ साधक नाहीत - यांना मोक्ष नाही)
४) वैकृत सृष्टी ऊर्ध्वस्रोत ही सृष्टी - देवसर्ग येथील लोकांला सुखाची लालसा होती, तेथील लोक ज्ञानी होते, सात्विक होते. (पुरुषार्थ साधक नाहीत - मोक्ष नाही)
५, ६, ७) अर्वाक्‌ सृष्टी - (पुरुषार्थ साधक, मोक्ष मिळू शकतो) - मनुष्यसृष्टी - सात्विक, राजस, तामस
८) अनुग्रह सृष्टी - सात्विक व तामस
९) कौमार सृष्टी

॥श्रीराम समर्थ॥