पंढरपूर यात्रा

पंढरपूर यात्रा
-------------------

आषाढात शुध्द एकादशीला व कार्तिकात शुध्द एकादशीला म्हणजे चातुर्मास सुरु होण्यापूर्वी व संपताना दोन मोठ्या यात्रा निघतात.
आळंदीहून श्रीज्ञानेश्वरमहाराजांची पालखी व देहूहून श्रीतुकाराममहाराजांची पालखी निघते. वाटेत अनेक पालख्या व गावोगावींच्या दिंड्या येऊन मिळतात. ५-१० लाख वैष्णवांचा समुदाय रोज २५-३० किलोमीटर अंतर पायी चालत उन-पाऊस-वारा याची पर्वा न करता हरिभजन करीत चालत राहतो.
वाटेत गावोगावी वारकर्‍यांचे उत्साहाने व प्रेमाने स्वागत होते. त्यांच्या भोजनाची-झोपण्याची-विश्रांतीची-औषधपाण्याची व्यवस्था केली जाते.
मुक्कामी पंढरपूरला पोचल्यावर ते चंद्रभागेमध्ये स्नान करतात, पुंडलिकाचे दर्शन घेतात, मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतात व गावी परततात.
पिढ्यान्‌पिढ्या अशा वारी करणारी वैष्णवांची घराणी आहेत.
काहीजण प्रत्येक एकादशीला वारी करतात.

॥श्रीराम समर्थ॥