श्रीआनंदसागर

श्रीआनंदसागर
----------------------------

------------
मूळ नाव - श्री. गोविंद अनंत कुलकर्णी
गाव - आठव्या वर्षीपासून इंदूरला
शिक्षण - फारसे नाही
पारमार्थिक वाचन - दासबोध
-------------
कुमारावस्थेतील विपत्ती -
दहाव्या वर्षी - वडील गेले. मिळकत भाईबंदांनी गिळंकृत केली.
१५ व्या वर्षी अर्थार्जन - थोडेफार लिखाई करून आपले व आईचे पोट भरणे
------------
परमार्थाकडे वाटचाल -
प्रपंचाचे दुःखमय स्वरूप मनापासून पटले.
दासबोधाचे मनन अधिक सूक्ष्म होत चालले.
एके दिवशी सिध्दपुरुषाच्या भेटीसाठी ते आतूर झाले असता, महाराजांनी समोर येउन दर्शन दिले व येऊन भेटण्यास सांगितले व महाराज अंतर्धान पावले.
-----------
महाराजांचा अनुग्रह -
ते जाऊन महाराजांना भेटले. गोविंदाचे मन शांत झाले. त्यांनी आपल्या आईला दर्शनासाठी नेले. महाराजांनी दोघांवर अनुग्रह केला. आणि रामसेवा करण्यास सांगितले.
----------------
साधन -
महाराजांनी दोघांना बडवई येथे साडेतीन कोटी जप करण्यास सांगितले.
एका पातळीवर साधना आल्यावर महाराजांनी गोविंदाचे पारमार्थिक नाव "आनंदसागर" ठेवले.
त्यांचे तेज प्रकट होऊ लागले.
महाराजांच्या आज्ञेचे ते अचूक पालन करीत.
महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी प्रपंच केला.
--------------------------
जीवितकार्य -
जालन्याला त्यांनी राममंदिर बांधले व ते भिक्षेवर चालवले.
त्यांचे ५-६ खर्‍या तयारीचे शिष्य मिळाले.
१९०५ साली ते महाराजांच्या बोलावण्यावरून गोंदवल्याला २-३ महिने राहिले.
१९०७ साली चंद्रग्रहणाच्या दिवशी नदीवर स्नान करून आल्यावर ते ध्यानस्थ बसले, ग्रहण सुटल्यावर त्यांनी महाराज, राम म्हणत देह ठेवला.
ते गेल्याचं कळल्यावर महाराज म्हणले होते," अरे अरे, माझा उजवा हात गेला".

महाराजांच्या अस्थींबरोबर त्यांच्याही अस्थी त्रिवेणीत सोडल्या गेल्या. महाराज म्हणले होते की," मी त्याच्या अस्थी माझ्याबरोबर घेऊन जाईन". म्हणून त्या ७-८ वर्षे जतन करुन ठेवल्या होत्या. १९१४ मध्ये त्या विसर्जित झाल्या.
-------------------------------------
हे सर्व वाचून मला काय वाटले?

महाराजांच्या चरित्राचा माझा अभ्यास अजूनही चालू आहे. त्याचबरोबर त्यांच्या अगदी निकटच्या मंडळींचा विशेषतः अंतरंगातील भक्तांचाही चालू आहे.

हे भक्त सर्वसामान्य माझ्यासारख्या माणसांपेक्षा कसे वेगळे असतात? प्रपंचातील त्रासाचा ते पारमार्थिक उन्नतीकरीता विशेषतः मोक्षासाठी कसा करुन घेतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी करते.
मला आनंदसागरांविषयी वाचताना असे वाटले की त्यांच्यावर आलेल्या प्रापंचिक संकटांमुळे लहानपणीच ते परमार्थाकडे वळले.
त्यांच्या त्यांच्या आईचा संपूर्ण पाठिंबा होता. साधनाही दोघांनी बरोबर केली. त्यांची आई त्यांना नमस्कार करीत असे.
त्यांची भक्ती, त्यांचे कार्य शांत व गाजावाजा न करणारे होते.
त्यांच्या जन्माचे कल्याण महाराजांनी केले.
त्यांच्या मोक्षाचा खरा आनंद त्यांच्या आईला झाला, ती बाकीच्या रडणार्‍या लोकांना म्हणाली की ,"तो गेला तो रामनाम घेत गेला, त्याचे जन्माचे सार्थक झाले, उगीच रडू नका. उलट आनंद माना."
धन्य ते आनंदसागर, धन्य त्यांची माता!

मध्यंतरी मराठवाड्यात संतदर्शनासाठी मी एक आठवडा होते. जालन्याचे राममंदिर पहाण्याची इच्छा असूनही जालन्यावरून गेले पण जालन्यात थांबून दर्शनाची इच्छा पूर्ण झाली नाही.
आता पुन्हा कधी जमते पहायचे!

॥श्रीराम समर्थ॥