उपनिषद म्हणजे काय?

उपनिषद्‌ म्हणजे काय?
-----------------
व्युत्पत्ति -
उप - जवळ
नि - मनापासून / भक्तिभावाने / नम्रपणाने
सद्‌ - बसणे
------------------
उपनिषद्‌ - आत्मविद्या शिकण्यासाठी विधीपूर्वक गुरुच्या जवळ जाणे आणि भक्तिभावाने बसणे.
------------------------
ब्रह्मविद्या ही ऋषीतुल्य व्यक्तींकडून ऐकून त्याचा गूढार्थ आकलन करून घेण्याची विद्या आहे. नुसत्या तर्काने ब्रह्मविद्या कळत नाही.
यात माणूस, जगत्‌ आणि ईश्वर या त्रयीचे मूलस्वरूप आणि परस्परसंबंध याविषयीचे समाधानदायक मार्गदर्शन केले आहे.

॥श्रीराम समर्थ॥