सनातनधर्म जिज्ञासा

सनातनधर्म म्हणजे काय?
(सनातन म्हणजे शाश्वत, निरंतर)
----------------------
सनातनधर्म वृषभरूपी मानला गेला आहे.
धर्माचरणाचे चार पाद (पाय) आहेत

१) सत्य,
२) तप,
३) दया,
४) दान
आत्मज्ञान म्हणजे ज्ञान
अध्यात्मचिंतन म्हणजे ध्यान
मनाची स्थिरता म्हणजे शम
इंद्रियांचा निग्रह म्हणजे दम
-----------------------------------------------
१) सत्य - सत्‌ - असणेपण. फक्त परमेश्वरच आहे - असतो.
बाकी काहीच नसते (दिसले तरी/भासले तरी - कारण सर्व निर्मिती कल्पनाजन्य आहे) हे जाणणे व अनुभवणे.
---------------------
२) सात्विक तप -
अ) शारीरिक तप -
देवता-ब्राह्मण-गुरु-ज्ञानी यांचे पूजन करणे व पावित्र्य-सरळपणा-ब्रह्मचर्य-अहिंसा आचरणे.
ब) वाणीचे तप -
उद्वेग निर्माण न करणारे, प्रिय, हितकारक, सत्य असे भाषण करणे.
क) मानसिक तप -
स्वाध्याय व अभ्यास करुन मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवत्चिंतन, मनोनिग्रह, अंतःकरणात शुध्द भाव ठेवणे.
----------------------
३) दया-
आपल्यापेक्षा शारीरिक-माणसिक-बौध्दिक-आर्थिक-सामाजिक-आध्यात्मिक दृष्ट्या दीन असणार्‍या व्यक्तीशी सौजन्याने वागणे
----------------------------
४) सात्विक दान -
कर्तव्यभावनेने, योग्य देश-काल (जिथे तुटवडा असतो) पाहून, पात्र व्यक्तीस (असमर्थ व दीन जो परतफेड करु शकणार नाही), उपकार न करणार्‍याला, श्रेष्ठ ज्ञानी-ब्राह्मण व संतांना दान करणे.
----------------------------------------
युगपरत्वे धर्माचरण -
सत्ययुगात - चारही तत्वांचे आचरण असते.
त्रेतायुगात - तप, दया, दान यांचे आचरण असते. (सत्य जाते)
द्वापरयुगात - दया आणि दान यांचे आचरण रहाते. (सत्य, तप जाते)
कलियुगात - फक्त दान हे आचरण शिल्लक रहाते. (सत्य, तप, दया जातात)
त्यामुळे कलियुगात सात्विक दानाचे महत्व आहे.

॥श्रीराम समर्थ॥