परमात्म्याची माया

परमात्म्याची माया

परमात्म्याच्या शक्तींपैकी प्रमुख शक्तीला महामाया म्हणतात.

तिचे काम परमात्म्याच्या अनंत अंशावर आवरण घालणे. व त्यांच्या जन्मदात्याचे विस्मरण करणे हे आहे.

सत्त्व, रज, तम हे गुण, पंचमहाभूते, अहंकार यांच्या साहाय्याने ती जीवात्म्याला मोहात पाडते

व त्याला विविध कर्मे करण्यामध्ये व त्यांची फ़ळे भोगण्यामध्ये इतकी गुंतवून ठेवते की त्याला त्याच्या मूळ स्थानाचा संपूर्ण विसर व्हावा.

-----------------------
या चित्रात वरच्या बाजूला एक केशरी गोळा आहे तो सगुण ब्रह्माचे प्रतीक आहे.
त्याच्या आसपास त्याच रंगाचे गोळे आहेत - ते त्याचे परमभक्त, अंशावतार, संत-सत्पुरुष, त्याच्या इच्छेने अवतारकार्य करणारे.
त्याच्या बाहेर पिवळे गोळे आहेत ते सत्वगुणी साधक. ते संख्येने मोजके आहेत.
त्याच्या बाहेर लाल रंगाचे गोळे आहेत ते रजोगुणी जीव.
त्याच्या बाहेर विविध रंगाचे व शेवटी काळ्या रंगाचे न संपणारे गोळे आहेत ते तमोगुणी जीव -हे न मोजता येणारे आहेत.
अशी ही विश्वरचना भगवंताच्या अनंत शक्तींपैकी एक शक्ती त्याच्या रंजनार्थ करते.
ही सर्व भासमय आहे.
ती विधात्याची मनोनिर्मिती आहे.
खरे अस्तित्व फक्त या सगळ्याच्या पलिकडे असलेल्या पण सगळ्यात अनुस्यूत असणार्‍या भगवंताचे असते.
त्याच्या कृपेशिवाय़ त्याला जाणता येत नाही.
त्याची माया जीवांना त्याच्याजवळ जाऊ देत नाही.
जीवाची ओढ मात्र त्याच्या निर्मात्याशी एक होण्याची असते.
म्हणून तो जन्मानुजन्मे बेचैन राहतो.

---------------------
मी, मला, माझे या प्रखर भावनांच्या आवेगाने तो संपूर्ण ग्रासला जातो. ज्या परमात्म्यापासून तो आला त्या त्याच्या निर्मात्याबद्दल तो अनभिज्ञ राहातो.
असंख्य लहानमोठे जीवजंतू, सजीव-निर्जीव यांना ती लीलया मोहात पाडत राहाते, गुंतवून ठेवते.

महामायेचे दोन भाग आहेत,
एक - जीवांना परमात्म्यापासून लांब नेते,
दोन - शारदा - मुमूक्षू, जिज्ञासू, तपस्वी, निष्काम भक्ती करणार्‍यां जीवांना परमात्म्यापर्यंत न्यायला मदत करते.

थोडीशी भोगवासना राहिली तरी त्यांचे पतन होते.

फ़क्त निष्काम, संपूर्ण शरणागत भक्त परमात्म्यामध्ये विलीन होतात.

॥श्रीराम समर्थ॥