नाशिवंत ते तू जाण माया

नाशिवंत ते तू जाण माया - (५ ते ९)

ओवी ५
स्वामींच्या सूचना -
दक्ष राहावे
मनापासून लक्ष द्यावे
आनंदपद घ्यावे
उथळपणा थांबवावा

ओवी ६
वृत्ती चंचल राहिली तर संदेहसागरात बुडशील.
चित्त संपूर्ण एकाग्र करावे. (एकाग्रता स्वभावगत झाली की तिला तपश्चर्या म्हणतात.)
ओवी ७
परिवर्तनाची - शुद्धीकरणाची प्रक्रिया -
सुरुवातीला लोखंड.
अग्नीत खूप तापवितात (मऊ होईपर्यंत - अहंकार कमी करणे).
घणाने घाव घालतात - गंज जातो, अशुद्धता जाते.
परिसाने घासतात.
लोखंडाचे सुवर्ण होते.

ओवी ८
लोखंडाचा गंज जर गळून पडला नाही तर त्याचा अंतर्भाग प्रकट होत नाही.
अविनाशी आत्मा + नाशिवंत अनात्मा (आवरण) = जीव (मूर्त, सांत, सीमित, अज्ञानी, दु:खी).
अज्ञानाचा मल मूळ आत्मस्वरूपावर.
वैराग्याचा अग्नी + विवेकाचे घाव - अज्ञान गळून अडते.
सद्‌गुरु - परिसस्पर्ष
जीवाचे ईश्वररूप सोने होते.
प्रथम आवश्यकता - कडकडीत वैराग्य. अपुर्‍या वैराग्यामुळे संतांच्या सहवासात बरीच वर्षे राहूनही शिष्य निजपदाला जात नाहीत.

ओवी ९
म्हणून जेवढे काही नाशिवंत आहे तेवढे मलीन आवरण समजावे.
त्या अनिष्ट मलाचा तू त्याग अकर.
ते आवरण गळून पडले की मग फक्त तूच तेवढा शिल्लक उरशील.
-------------------------
निरूपण -
नाशिवंताचा नाद सोडायचा.
पूर्वी साचलेले नाशिवंत निस्तरायचे.
लपलेले आपले मूळ स्वरूप प्रकट होते.
जिकडे तिकडे तेच स्वरूप अनुभवास येते.
--------------------------------------------------------
नाशिवंत ते तू जाण माया - प्रमुख मुद्दे (ओवी ५ ते ९)
चित्त एकाग्र करण्याची आज्ञा.
अविनाशी आत्मा (मूळस्वरूप), त्यावर अनात्म नाशिवंत अज्ञानाचा मल.
तापवणे (वैराग्य अग्नीने) + विवेकाचे घाव घालणे + सद्‌गुरुरूपी परिसाने घासणे = गंजलेल्या लोखंडाचे शुद्ध सुवर्णामध्ये रूपांतर
नाशिवंत मलाचे आवरण गळून पडले की आपले मूळा स्वरूप प्रकट होते.

॥श्रीराम समर्थ॥