अनुग्रहीत साधक

अनुग्रहीत साधक
------------------
- प्रापंचिक जीवनात बसलेला आकस्मिक धक्का (आई-वडील-जोडीदार-मुले यांचा मृत्यू/विपन्नावस्था/अपमान इ.), अकस्मात लाभलेली संतसंगती

(प्रत्यक्ष सहवास/ग्रंथवाचन/इतर साधकांचा सहवास/दृष्टांत) अशासारख्या कारणांमुळे याच्या अंतरंगात आमुलाग्र परिवर्तन घडून येते.
- "मी कर्ता" हा भ्रम आहे, हे त्याला पटते.
- ज्या जगातील माणसांकडून आणि वस्तूंकडून आपण कायमच्या समाधानाची अपेक्षा करतोय ती फोल आहे, हे त्याला कळून चुकते.
- कायमचे समाधान कोठून मिळेल; ते ज्याच्यापाशी आहे, तो भगवंत कधी भेटेल, याची त्याला तळमळ लागते. दिवसरात्र त्याला दुसरं काही सुचत नाही.
सद्गुरुविना सर्व धडपड व्यर्थ आहे, हे त्याच्या लक्षात येते.
- तो परमात्म्याला मनोमन शरण जातो.
- त्याची चित्तशुध्दी पुरेशी झाल्यावर सद्गुरु कृपावंत होऊन त्याला स्वीकारतात.
साधक सनाथ होतो.
- सद्गुरु त्याच्या मोक्षाची हमी घेतात.
- त्याच्याकडून ते साधन करवून घेतात.
- साधनेत येणार्‍या अडचणी ते निवारतात.
- फारच थोडेजण याच जन्मात शेवटाला (मोक्षाला/निजधामाला/परमपदाला) जातात.
- या जन्मात केलेली तयारी साधकांना पुढील जन्मात उपयोगी पडते.
- सद्गुरुने दिलेल्या सिध्दमंत्राद्वारे सद्गुरुरूप परमात्म्याचे त्याचे अनुसंधान जडते.

॥श्रीराम समर्थ॥