परमात्मा

परमात्मा:
परमात्म्याला जाणल्यावर मनुष्य परमानंद प्राप्त करुन घेतो.

परमात्मा कसा आहे?

 • परमात्मा अनादी आहे,
 • हे परब्रह्म सत्‌ ही नाही आणि असत्‌ही नाही.
 • हे परब्रह्म सर्व बाजूंनी हातपाय असणारे आहे,
 • ते सर्व बाजूंना डोळे असणारे आहे,
 • ते सर्व बाजूंना मुखे असणारे आहे,
 • ते सर्व बाजूंना कान असणारे आहे,
 • हे परब्रह्म सर्वांना व्यापून राहिले आहे.
 • परब्रह्म सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारे आहे,
 • ते सर्व इंद्रियांनी रहित आहे,
 • ते आसक्तीरहित आहे,
 • ते सर्वांचे धारण-पोषण करणारे आहे,
 • ते निर्गुण आहे,
 • ते गुणांचा भोग घेणारे आहे.
 • परब्रह्म ज्योतींची ज्योती आहे,
 • ते तमाच्या पलिकडे आहे,
 • ते ज्ञान आहे,
 • ते ज्ञानगम्य आहे,
 • ते सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहे.

(संदर्भ: श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १३ - क्षेत्रक्षेत्रज्ञयोग - श्लोक १२-१७)

श्रीराम समर्थ॥