अध्यात्मातल्या प्रधान समस्या

अध्यात्मातल्या प्रधान समस्या (ओव्या २५ ते २९)

ज्ञान होण्यासाठी जिज्ञासेची गरज
स्वत:च्या अस्थित्त्वाविषयी मूलभूत प्रश्न पडणे ही पहिली पायरी
या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सद्‌गुरुंकडून श्रवण व मनन अवश्य असते.

ओवी २६
अध्यामातील विचारपद्धतीला मनन म्हणतात.
प्रत्येक जन्मात जीव, या देहाला आपला मानतो.
त्यासंबंधाने व्यक्ती, वस्तू यांनाही आपले मानतो.
या ममत्वामुळे सुखदु:खे भोगतो.
अंत:काळी हे सर्व सोडून जाताना त्याचे ओढाताण होते.
या जगात आपले नेमके काय आहे? काय आपले नाही याचा शोध घ्यायला हवा.

ओवी २७
सद्‌गुरु शिष्याला सांगतात -
या जगात तुझे काहीच नाही.
मोहाने तू माझे-माझे म्हणतो आहेस.
काहीतरी प्रमाद घडल्यामुळे तू इथे आला आहेस. तुझे मूलस्थान वेगळेच आहे.
आता तू मूळ ठिकाणाला जावेस.

ओवी २८
तू खरेतर सर्वशक्तीमान ईश्वराचे मूळ आहेस.
अहंकार धारण केल्याने संसारात अडकलास.
हा अहंकार टाकलास तर संसाराच्या पार लागशील (पलिकडे पोहोचशील)
(जीव म्हणजे कालप्रवाहामध्ये पराधीनपणे वाहाणारे ईश्वराचे सांतरूप. अहंकार नाहीसा झाला की, जीवावरील कालाचे स्वामित्त्व आपोआप संपते.)

ओवी २९
तू ईश्वरापासून निर्माण झालास
विस्मृतीमुळे तू स्वत:ला वेगळा समजू लागलास.
त्यामुळे तुला जीवनात तीव्र दु:खे भोगावी लागली.

॥श्रीराम समर्थ॥