एकाग्र श्रवणमनन

एकाग्र श्रवणमनन
संतांचे वैशिष्ठ्य -

ओवी २१
संतांना शिष्याच्या कल्याणाची एवढी तीव्र तळमळ असते की, जिज्ञासा नसतानादेखील ते त्याला ज्ञानदान करायला सिद्ध असतात.
श्रवण - मनन - निदिध्यास - आत्मदर्शन

ओवी २२
एकाग्रतेने गुरुचे बोलणे ऐकले तर ते अध्यात्मामध्ये साधन म्हणून शिष्याला उपयोगी पडते.

ओवी २३
सद्‌गुरुंचे शब्द म्हणजे दिव्य वाणी.
त्यांचा वर्षाव मुक्तपणे होतो.
तो कानांचे द्रोण करून गोळा करावा.
मन इकडेतिकडे जाऊ देऊ नये.
गोळा केलेल्या ज्ञानावर हेतूपूर्वक विचार, चिंतन करावे, म्हणजे ते ज्ञान आत्मसात होते.

ओवी २४
संतवाणीचा अर्थ कसा लावावा? -
संतांच्या स्वरूपानुभवाचा संदर्भ सोडू नये.
त्यांचा हेतू नजरेआड करू नये.
त्यांच्या शब्दांचा गर्भितार्थ आपल्या हातून निसटू देऊ नये.
त्याचा सारांश मनामध्ये साठवावा.

॥श्रीराम समर्थ॥