दैनंदिन निष्काम उपासना (साधना)

दैनंदिन निष्काम उपासना
------------------------------
दैनंदिन म्हणजे रोज - दिवसा व रात्री
निष्काम म्हणजे देवाकडे काहीही न मागता केलेले कर्म
उप म्हणजे जवळ, उपासना म्हणजे भगवंताजवळ मनाने असणे/बसणे
----------------------
जो पर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत भगवंताच्या सगुण रुपाची अर्चना व निर्गुणाविषयीचे वाचन, चिंतन व मनन करावे. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर सुध्दा सगुण रुपाची अर्चना चालू ठेवावी, असे महाराजांनी सांगितले आहे.
------------------------
प्रत्येक कर्म भगवंतासाठी करणे, त्याचे स्मरण करीत करणे, ते झाल्यावर त्यालाच अर्पण करणे.
-----------------
कर्म करताना सद्‌गुरुंना, रामाला सांगून करणे. ते करताना तो आपल्याकडे बघतो आहे, आपल्या मनातील विचार ऐकतो आहे, आपल्या मनातील भावाकडे त्याचे लक्ष आहे, आपली प्रत्येक कॄतीला तो साक्षी आहे या प्रकारे करणे व त्यातून आपल्यातील दोष सुधारणे ही एक आनंददायी मात्र खडतर साधना आहे.

॥श्रीराम समर्थ॥