अकरा मारुती

अकरा मारुती

स्वामी समर्थ रामदासांनी त्याच्या कार्याचा एक महत्वाचा भाग म्हणून मारूतीरायाची बरीच मंदिरे भारतभर स्थापन केली.
बलोपासना, लोकसंग्रह, परमार्थाचे अधिष्ठान असलेली ही मंदिरे व तेथील उपासक यांचा श्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या कार्याला हातभार लागेल अशी त्यामागची कल्पना असावी.
त्यातील कृष्णेकाठची ११ मंदिरे राजकारण व समाजकारणासाठी विशेष महत्वाची मानली गेली होती.

संदर्भ - समर्थ स्थापित अकरा मारूति
लेखक - श्री. पु.वि.हर्षे
केशव भिकाजी ढवळे प्रकाशन
-------------------------------------

(१) शहापूर,
(२) मसूर,
(३) चाफळ (दास मारुती),
(४) चाफळ (प्रताप मारुती),
(५) शिंगणवाडी,
(६) माजगाव,
(७) उंब्रज,
(८) बतीसशिराळे,
(९) पारगाव,
(१०) मनपाडळे,
(११) बाहेबोरगाव

॥श्रीराम समर्थ॥