तीर्थयात्रा

तीर्थयात्रा
(संदर्भ - भारतीय तीर्थक्षेत्रे, लेखक - गजानन खोले, इंद्रायणी साहित्य प्रकाशन)
नृणां पापकृतां तीर्थे पापस्य क्षमनं भवेत्‌ ।
यथोक्तफलदं तीर्थं भवेत्‌ शुद्धात्मनां नृणाम्‌ ॥

‘तृ’ धातूला ‘थ’ प्रत्यय जोडून, ‘तीर्थ’ शब्द तयार झाला आहे. ‘तृ’ म्हणजे ‘तरणे’.
ज्याच्या योगाने पापापासून तरून जाता येते ते ‘तीर्थ’.
-----------------------------------------
‘यात्रा’ हा शब्द संस्कृत ‘यत्‌’ या क्रियापदापासून निर्माण झाला आहे. ‘यत्‌’ म्हणजे जाणे. पवित्र क्षेत्राला जाणे म्हणजे ‘यात्रा’.
-------------------------------------------------
‘क्षेत्र’ म्हणजे ‘शेत’ किवा ‘जागा’. विशेष अर्थ ‘पवित्र भूमी’.
भगवान श्रीकृष्णाने आपल्या गीतेतील तेराव्या अध्याय ‘क्षेत्र म्हणजे शरीर’, अशी व्याख्या दिली आहे. प्रत्येकाच्या शरीरामध्ये हृदय आहे आणि हृदयात परमेश्वर आहे. जिथे परमेश्वराचा नित्य निवास असतो, ते ‘क्षेत्र’.
-----------------------------------------------------
पूजेच्या वेळी देवांना जे स्नान घालतात, ते पाणी, पंचामृत आपण तीर्थ म्हणून पितो.

तीर्थानाम्‌ उत्तमम्‌ तीर्थं विशुद्धि: मनस: पुन: । - स्कंदपुराण

अर्थ - मनाची विशुद्धी हेच सर्व तीर्थांमधील सर्वात उत्तम तीर्थ.
--------------------
तीर्थं परं किं स्वमनो विशुद्धम्‌ । - आद्य शंकराचार्य

अर्थ - आपले मन शुद्ध करण्यासाठी तीर्थक्षेत्री जावे.
--------------------------------
तीर्थक्षेत्री पितरांची श्राद्धे केली तर त्यांचे आत्मे संतुष्ट पावतात आणि त्यांना सद्‌गती प्राप्त होते.
तीर्थाटन करणारा यात्री मोठमोठ्या पापांतून मुक्त होऊन पुण्यलोक प्राप्त करीत असतो. - अथर्ववेद

॥श्रीराम समर्थ॥