मंगलाचरण

मंगलाचरण (१ -१०)
ब्राह्मदर्शनाची पाच अंगे -

१) ध्यानमग्न साधकाला स्वत:च्या अंतर्यामी स्वस्वरूपाचे दर्शन घडते. (स्वस्वरूपदर्शन)
२) स्वत:च्या हृदयात वास करणारे आत्मस्वरूप सर्व विश्वामध्ये अंतर्यामीपणाने व्यापून आहे, असा साक्षात प्रत्यय येतो. (ईश्वरदर्शन)
३) केवळ शुद्ध परमात्मस्वरूपात विलीन होणे, स्थिरावणे. (शुद्ध अस्तित्त्व)
४) चित्‌शक्ती म्हणजे ज्ञानमय आदीशक्तीची प्रत्यक्ष प्रचीती येते. (शारदादर्शन)
५) सद्‌गुरुकृपा ही परमत्म्याची विलक्षण शक्ती प्रसन्न होते, जीवपणा सुटतो, ब्रह्मानंद पचवला जातो, हृदयात जीव-शिव ऐक्य होते. (तुर्यातीत अवस्था)

॥श्रीराम समर्थ॥