प्रस्तावनेचे सार

प्रस्तावनेचे सार

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांची सूचना/आदेश -

"आपल्या सर्व वाङ्मयामध्ये श्रीसमर्थांनी अंतःकरण ओतले. पण आत्मारामामध्ये त्यांचे हृदय सापडते. बधानेच नव्हे तर सिध्दाने सुध्दा आत्मारामापासून परमार्थ शिकावा."
-----------------------------------
महत्वाचे मुद्दे -

- आत्माराम ही समर्थांची महत्वाची रचना
- लघुशरीर (श्लोकसंख्या अगदी थोडी)
- गहन आत्मविद्या अगदी सुटसुटीत व सोप्या शब्दांत सांगितलेली
- हा तत्वज्ञानावरील ग्रंथ आहे.
- तत्वज्ञान म्हणजे आपण स्वतः आत्मस्वरूप आहोत असे जाणणे.
- आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्याने जीवन निर्भय, चिंतामुक्त, दुःखरहित व सार्थ बनते.
- आत्मविद्येचा आरंभ आत्म-अनात्मविवेकापासून होतो.
- ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी आत्मज्ञानी पुरुषाचे मार्गदर्शन घेणे जरुरीचे असते.
- कर्तेपणाचा अभिमान परिच्छिन्नता निर्माण करतो. परिच्छिन्नता निवृत्त होऊन अनंतामध्ये विलीन होणं याला मोक्ष म्हणतात.
- आत्माराम ही एका ब्रह्मज्ञानी पुरुषाची अपौरुषेय वाणी आहे.
- साधकाने शुध्द आत्मजिज्ञासेने त्याचा सूक्ष्म अभ्यास करावा.

  • नामस्मरणाने वृत्ति गोळ्या कराव्या.
  • मन हृदयात मुकुलित करावे.
  • एकाग्र बुध्दीने आत्मारामाची एकेक ओवी वाचावी
  • श्रीसमर्थांच्या अर्थाशी समरस होण्याचा अभ्यास करावा.
  • जो अर्थ आकळेल त्यावर संतत धारणा धरावी

- योग्य काली सद्‌गुरुची कृपा होऊन स्वरूपदर्शन घडेल यात संशय बाळगू नये.
-( श्री. केशव बेलसरे )

॥श्रीराम समर्थ॥