शरभंगऋषीकृत रामस्तुती

शरभंगऋषीकृत रामस्तुती
तुझे दर्शन व्हावे अशी माझी फार इच्छा होती.
तू प्रत्यक्ष परमेश्वर आहेस.
आज माझी तपश्चर्या सिद्धीस गेली.
मी जे बरेच पुण्य आजवर मिळवले आहे ते सर्व आज तुला अर्पण करतो.
आता मी मुक्तीस जाईन.
चितेवर आरोहण करीत असता त्यांनी रामाच्या सर्वांगसुंदर रूपाचे एकसारखे ध्यान चालवले होते.
मी तुझे अनन्यभाव स्मरण केले हे जाणून तू मला आज तुझे दर्शन देत आहेस.
मी तुला पाहात असल्याने निष्पाप झालो आहे.
सीता ज्याच्या वामांकावर आरूढ झाली आहे असा तो अयोध्यापती श्रीराम माझ्या हृदयात सर्व काळ वास करो.