तीर्थांचे प्रकार

तीर्थांचे प्रकार

सप्ततीर्थे - स्कंदपुराण
१) सत्य,
२) क्षमा,
३) इंद्रियसंयम,
४) दया,
५) प्रियवचन,
६) ज्ञान,
७) तप

पंचतीर्थे -
१) गुरु,
२) माता,
३) पिता,
४) पती,
५) पत्नी

भगवद्‌भक्त हा स्वत:च एक तीर्थ असतो. - व्यासमहर्षी
तिथे अच्युताची (भगवान कृष्णाची) सुंदर कथा चाललेली असते तिथे सर्व तीर्थे उपस्थित असतात.
ज्या घरात नेहमी भगवंताचे गुणगान केले जात असते, ते घरच तीर्थस्वरूप असते.

नित्यतीर्थे -
कैलास, काशी, गया, प्रयाग वगैरे क्षेत्रे.
गंगा, यमुना, सरस्वती इत्यादी नद्या.

भगवदीय तीर्थे -
भगवंतांनी ज्या क्षेत्री अवतार घेतले, ती क्षेत्रे.

संततीर्थे -
संतांची जन्म व निर्वाण गावे.

भारतभूमी हीच मुळी देवांची, ऋषीमुनींची, संतांची भूमी आहे. त्यामुळे आपला सर्व देशच एक तीर्थक्षेत्र आहे. जगाच्या पाठीवर अनेक संस्कृतींचा उदय झाला आणि अस्तही झाला. पण भारतीय संस्कृती अजरामर राहिलेली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे भारतीयांची तीर्थक्षेत्रे.

॥श्रीराम समर्थ॥