प्राकृतिक प्रलय

प्राकृतिक प्रलय -

या प्रलयात पृथ्वीपासून ते महः पर्यंत सर्व तत्वांचा संहार होतो.
सलग भीषण अवर्षण पडल्याने व अग्नीच्या संपर्काने (१२ आदित्यांच्या धगीने) पृथ्वीवरील सर्व जल (गंध हे तन्मात्र) नष्ट होते.

नंतर महाभयानक वृष्टी होते व पृथ्वी जलरूप होते.
वेगाने वाहणारे वारे जलाला शोषून घेतात व त्याचे रस हे तन्मात्र नष्ट होते.

जलाचे तेज होते...जल अग्नीच्या स्थितीस जाते. हळुहळु जग अग्नीच्या ज्वाळांवी भरून जाते.
त्या तेजास वायू ग्रस्त करून टाकतो. तेजाचे रूपतन्मात्र नष्ट होते.

जग आता प्रचंड वायूरूप होते व प्रकाशरहित हो्ते.
वायूला आकाश ग्रासून टाकते व वायूचे स्पर्श हे तन्मात्र नष्ट होते.

जग आता रूप-रस-गंध-स्पर्शहीन व अनावृत्त आकाश होते.
आकाशाला अहंकार ग्रासून टाकतो व त्याचे शब्द हे तन्मात्र नष्ट होते.

भूते व इंद्रिये ह्यांचा अहंकारात लय होऊन जातो - त्या अभिमानात्मक अहंकारास तामस असे म्हणतात.
बुध्दीरूपी महतत्व त्या अहंकारास ग्रासून टाकते.
प्रकृतीचे व्यक्त स्वरूप हे अव्यक्तात लय होते.
नंतर अव्यक्त प्रकृती परमात्म्यामध्ये लय होते.

॥श्रीराम समर्थ॥