त्रैलोक्य

त्रैलोक्य -
सात पाताळासह पृथ्वी, अंतरिक्ष व सात स्वर्ग यांना त्रैलोक्य म्हणतात.
पृथ्वीला भूः
अंतरिक्षाला भूवः
स्वर्गाला -स्वः

असे म्हणतात.

हे चित्र मी माझ्या सुरुवातीच्या साधनाकालात काढलेले आहे. डावीकडे पाताळलोक आहे त्यात भले मोठे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत तेथे अंधार-अज्ञान-भोग यांचे साम्राज्य आहे. मध्ये पृथ्वीलोक काढलेला आहे. तेथे भोगयोनी मधील चराचर सृष्टी व मनुष्य रहातात. मनुष्याच्या अहंकारजन्य कर्मानुसार पापकर्मे व पुण्यकर्मे अशी विभागणी त्याच्या मृत्यूनंतर होते. पापकर्मे जास्त असल्यास पाताळलोक वा नरक, पुण्यकर्मे जास्त असल्यास स्वर्गलोक व दोन्ही सारखे असल्यास पृथ्वीलोक अशी त्या जीवाला गती मिळते.

॥श्रीराम समर्थ॥