निर्गुण उपासना

निर्गुण उपासना -
---------------------------------
निर्गुण उपासना होते.
ती करावी वा दाखवावी लागत नाही.
या निर्गुण स्थितीमध्ये भक्त आणि भगवंत एकरुप असतात. भगवंताचे सर्व गुण भक्तामध्ये आलेले असतात.
सदैव जागं असणं,
सगळीकडे असणं,
सर्वज्ञ असणं,
आनंदरुप असणं,
असून नसल्यासारखं असणं,
कर्म करुन लिप्त नसणं,
भक्ताची आत्मबुध्दी झालेली असते.
अहम्‌ ब्रह्मास्मि । (मी ब्रह्म आहे) च्या पलिकडे तो गेलेला असतो.
सर्वम्‌ खलु इदम्‌ ब्रह्म । (सगळे काही ब्रह्मच आहे) हे तो अनुभवीत असतो.
सर्वाभूती परमेश्वर । (सर्व चराचर परमेश्वरच आहे. बाकी काही नाही) हे त्याच्या लोकव्यवहाराचे अधिष्ठान असते.

॥श्रीराम समर्थ॥