सिध्दपीठ

सिध्दपीठ /गुरूस्थान -

हे पीठ कसे असावे, ते कसे चाललावे याविषयी महाराजांनी आदर्श घालून दिलाय -

अहो मंदिरवासी जन। तुम्ही ऐकावे वचन।
तुम्ही ऐकावे वचन ॥१॥

आल्या अतिथा अन्न द्यावे। रामनाम दृढ घ्यावे ।
रामनाम दृढ घ्यावे ।।२॥
पूजा करावी त्रिकाळ। अंगी वैराग्याचे बळ।
अंगी वैराग्याचे बळ।।३॥
नका धरू काही आस। नाम जपा श्वासोश्वास ।
नाम जपा श्वासोश्वास ।।४॥
पंचपदी भजन करा। रामनाम दृढ धरा ।
रामनाम दृढ धरा ।।५॥
नम्र व्हावे सर्वा भूतां । परनारी राहो माता ।
परनारी राहो माता ।।६।
भाव ठेवा रामापायी । कोणा मागू नका काही ।
कोणा मागू नका काही ।।७॥
दास म्हणे गुरूपुत्र । तोचि होईल जीवनमुक्त ।
तोचि होईल जीवनमुक्त ।।८॥
जीवनमुक्ता नाही भेद । हाचि माझा आशीर्वाद ।
हाचि माझा आशीर्वाद ।।९॥

॥श्रीराम समर्थ॥