आपले पितर कोठे कोठे असतात?

आपले पितर कोठे कोठे असतात? -
काहीजण पृथ्वीवर पुन्हा जन्म घेतात.
काही पितर ‘द्यु:’ (स्वर्ग) लोकात देवयोनी मिळवतात.
काहीजण अंतरिक्षात भूत-प्रेत या योनींमध्ये असतात.

------------------------
श्राद्धामध्ये मंत्रयुक्त श्रद्धेने जे जे दिले जाते ते या तीनही ठिकाणी असणार्‍या आपल्या पितरांना मिळते. पितर ज्या स्वरूपात असतील त्यानुसार योग्य प्रकारचे अन्न त्यांना प्राप्त होते.
देवयोनीतील पितर – अमृतरूपाने अन्न मिळते.
गंधर्वरूपातील पितर - निरनिराळे भोग मिळतात.
पशूरूपातील पितर – गवत इ. अन्न मिळते.
नागयोनीतील पितर – वायूरूपाने अन्न मिळते.
यक्षयोनीतील पितर – द्रवरूपात अन्न मिळते.
राक्षसरूपातील पितर – मांसरूपात अन्न मिळते.
प्रेतरूपातील पितर – रक्तरूपात अन्न मिळते.
मनुष्यरूपातील पितर – अन्न व इतर भोग मिळतात.
---------------------------------------
‘तृप्ती’ हे श्राद्धाचे फळ आहे. तृप्ती हा मनाचा आविष्कार आहे.

॥श्रीराम समर्थ॥