(पितृपक्षातील) पार्वण श्राध्द

पार्वण श्राध्द (पितृपक्षातील)-
पितृपक्षातील (भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षाचे पंधरा दिवस) श्राद्धाला ‘पार्वण’ किंवा ‘महालय श्राद्ध’ म्हणतात.
या काळात पितरांचा निवास मुलाच्या घरामध्ये असतो.

हे पितर पितृलोकातून किंवा प्रेतपुरीहून वायूरूपात येऊन आपला हविर्भाव (भावयुक्त दान) घेतात. या काळात श्राद्ध केल्याने पितर संतुष्ट होतात.
त्यांच्या आशीर्वादाने कुळाची वृद्धी होऊन सुख व ऐश्वर्य प्राप्त होते.
भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते अश्विन शुक्ल पंचमी हा श्राद्धाचा उत्तम काळ मानला जातो. कन्या राशीत सूर्याचा प्रवेश झाल्यापासून ते वृश्चिक राशीत सूर्य जाईपर्यंत हे श्राद्ध करावे.
---------------------------
महालय श्राद्ध -
महालयामध्ये कोणाकोणाचे श्राद्ध करतात? -
पुढील यादीतील जे नातेवाईक मृत असतील त्यांना उद्देशून श्राद्ध करतात.

 • आई, आईची आई, पणजी,
 • वडील, आजोबा, पणजोबा,
 • आईचे वडील, आजोबा, पणजोबा
 • वडिलांची आई, आजी, पणजी
 • सावत्र आई (असल्यास),
 • पत्नी,
 • मुंज झालेला मुलगा,
 • लग्न झालेली मुलगी,
 • काका, काकू
 • मामा, मामी
 • भाऊ, वहिनी
 • आत्या, आत्याचे यजमान
 • मावशी, तिचे यजमान
 • बहीण, तिचे यजमान
 • सासू-सासरे,
 • गुरू,
 • विद्यादाते,
 • मोक्षगुरू,
 • आप्त.

याशिवाय चार धर्मपिंड असतात –
(१) सृष्टी निर्माण झाल्यापासून आई-वडीलांच्या कुळात पूर्वी उत्पन्न झालेले लोक, आपल्या आधीच्या जन्मातील आप्त, या जन्मातील दास, पौश्य, आश्रित, सेवक, स्नेही, संपर्कात आलेले, उपकार केलेले, पशू, वृक्ष इ.,
(२) पितृकुलातील, मातृकुलातील, स्वत:शी संबंधित कुलाशी, पिंड अथव उदक यांपासून वंचित राहिलेले, जन्मांध, पांगळे, विरूप, गर्भपात झालेले जीव, ज्ञात-अज्ञात बांधव,
(३) स्वत:शी संबंधित नरकात गेलेल्या व्यक्ती,
(४) कुलक्षय आणि कुलनाश झाल्यामुळे ज्या जीवांना पिंड मिळत नसेल ते.

अशा प्रकारे हजारो-लाखो आत्म्यांना उद्देशून श्राध्द (श्रध्दायुक्त तिल व उदक यांचे दान) करता येते.
याचा उपयोग आपल्या पुढच्या पिढीच्या सर्वांगीण उन्नती होण्य़ासाठी करता येतो.

॥श्रीराम समर्थ॥