जिज्ञासू माणूस

जिज्ञासू माणूस-

१) दृश्य जगाबद्दल जिज्ञासा -
जगात घडणार्‍या घटनांबद्दल त्याला कुतुहल वाटतं.
नैसर्गिक बदल, माणसांचे स्वभाव, नैसर्गिक वैविध्य त्याचं मन वेधून घेतात.

हे कोठून आलं?
त्याचं काय झालं?
का हे घडलं?
आता काय होईल?
हे असं का?
आता काय करता येईल?

असे प्रश्न त्याला पडतात. हे प्रश्न जास्त करुन बाहेरील दृश्य जगाबद्दल असतात.
या जिज्ञासेशी त्याचं अनुसंधान जडतं. अशी जिज्ञासू माणसं सर्वसामान्य माणसांपेक्षा वेगळी असतात. ती शोध घेतात, शोध लावतात. स्वार्थ साधतात काही अनेकांचं भलंही करतात. मात्र मिळालेल्या उत्तरांनी त्यांचं पूर्ण समाधान होत नाही.

२) अदृश्य जगाबद्दल जिज्ञासा -

अशी माणसं तुलनेनं अजूनच कमी असतात. ती सगळ्यात असून नसल्यासारखी असतात. दृश्य जगापाठीमागील करवत्या अदृश्य शक्तीबद्दल त्याला कुतुहल वाटते. वैविध्यामधील एकत्व शोधण्याचा तो प्रयत्न करु लागतो.
बरेचदा हे त्याचं संशोधन बाह्य जगातील व्यवहारापुरतं मर्यादित राहतं.
अशी माणसं लेखन करतात, काव्य लिहितात, चित्रे काढतात. क्रांति करु शकतात.
ही अंतर्मुख प्रवृत्तीची असतात.

या जिज्ञासेशी त्यांचं अनुसंधान जडतं.

॥श्रीराम समर्थ॥