श्रीमत्‌आद्यशंकराचार्य

श्रीमत्‌आद्यशंकराचार्य

मी श्रीआद्य शंकराचार्यांचे चरित्र अनेकवेळा वाचून काढले आहे.
त्यांच्यामधील जे विशेष मला आवडले ते असे -

- त्यांचे अवतार रहस्य - ते श्रीशंकरांचा अवतार होते.
- त्यांची मातृभक्ती
- त्यांची असामान्य तरल बुध्दिमत्ता
- बालवयातच सर्व शास्त्रे ग्रहण होणे
- वयात येण्यापूर्वीच आचार्य होणे
- गुरुसाठी त्यांची तळमळ
- पायी चालत केरळहून नर्मदातीरी जाऊन आपल्या सद्‌गुरुंचा त्यांनी घेतलेला शोध
- सद्‌गुरु आपल्या सद्‌शिष्याची पाहत असलेली वाट. अनेक शतकांनी त्यांची होणारी भेट.
- सद्‌गुरुनिर्दिष्ट केलेली साधना
- सद्‌गुरुंची अवतारकार्यसमाप्तॊ
- साधना मुरण्यासाठी शंकरार्चांयांनी केलेले कठोर तप.
- सर्व दिशांना केलेले भारतभ्रमण
- हजारो शिष्यांनी घेतलेला अनुग्रह
- पट्टशिष्यांचे विशेषत्व
- भारतातील प्रमुख देवतांपुढे उभे राहिल्यावर श्रीशंकराचायांनी केलेले उत्स्फुर्त उत्कट कवित्व
- त्यांनी सर्व भारतीय प्रापंचिकांसाठी चालू केलेली पंचायतन पूजा. त्यामुळे शैव-वैष्णव-सौर-शाक्त-गाणपत्य यांच्यामध्ये होणारे युध्द व हिंसाचार कमी झाला.
- ८०हून अधिक पंथांना त्यांनी एका छात्राखाली आणले.
- वेदाचे महत्व वाढवले.
- चार दिशांना चार वेदपीठे चालू केली व तेथे आपल्या शिष्यांची नियुक्ती केली. त्यांच्यासाठी आचार-विचार-विहाराचे दंडक घालून दिले
- धर्माच्या नावाखाली चाललेला वामाचार थांबविला
- त्यांची शांति-क्षमाशीलता-विलक्षण तेज-सरलत्व-निर्ममत्व-कळवळा अतुलनीय
- ते कलियुगातील जगत्‌गुरु आहेत. जसे त्रेतायुगात वसिष्टऋषी, द्वापरयुगात व्यासमहर्षी.
- त्यांनी व्यासांच्या ब्रह्मसूत्रांवर भाष्य लिहिले.
- त्यांनी त्यांच्यावर झालेला विषप्रयोग, अघोरी तंत्रप्रयोग पचवला.
- अवतारकार्य झाल्यावर श्रीकेदारनाथाच्या सन्निध्यात त्यांनी सदेह मुक्ती अनुभवली.
अशा अतिशय प्रेरणादायी जगत्‌गुरुंना माझे शतश‍ः प्रणाम.
॥श्रीराम समर्थ॥