श्रीरामकृष्ण परमहंस

श्रीरामकृष्ण परमहंस

हावडा येथे श्रीदक्षिणेश्वरीच्या मंदिराच्या परिसरातील त्यांची खोली व त्यांच्या वस्तू जतन करुन ठेवल्या आहेत आणि त्यांचे पावित्र्यही छान राखले आहे. त्यांच्या दर्शनानंतर श्रीकालीमातेचे दर्शन घेतल्यावर एकदम आपण एका वेगळ्याच भावावस्थेत जातो. श्रीपरमहंसांनी केलेली साधना भक्तीमार्गातील पांथस्थांसाठी आदर्श आहे. त्यांनी दासभक्ती, सखाभक्ती, बाळभक्ती, प्रेमभक्ती अशा सर्व प्रकारचे टोकाचे अनुभव घेतले. त्यांनी सर्व धर्मांतील प्रमुख गुरुंकडून दीक्षा घेऊन त्या त्या प्रकारच्या साधना केल्या. सगुण भक्तीमधे ते फार पोचलेले लीलाविग्रही संत होते. अतिशय साधे पण सर्व साधलेले हे संत मला अतिशय प्रेरणादायी आहेत.