स्वर्गातील विविध मंडले

स्वर्गातील विविध मंडले

१) सूर्य ( हा सूर्य म्हणजे आपल्याला माहित असलेला सूर्य नव्हे)

सूर्यरथाचे अश्व - वेदांचे ७ छंद -
गायत्री
बृहती
उष्णिक्‌
जगती

त्रिष्टुप्‌
अनुष्टुप्‌
पंक्ति

या सूर्याचा कधी उदय होत नाही, कधी अस्त होत नाही.

१२ आदित्यांची नावे -
१ - धाता
२ - अर्यमा
३ - मित्र
४ - वरुण
५ - विवस्वान्‌
६ - इन्द्र
७ - पूषा
८ - सविता
९ - भग
१० - त्वष्टा
११ - विष्णु

------------------
२) चंद्रमंडल - (हा आपला चंद्र नव्हे)

चंद्राच्या रथाला ३ चाके आहेत.
१० श्वेत घोडे हा रथ ओढतात.(हे सर्व प्रतिकात्मक वर्णन आहे.)
---------------
३) इथे नक्षत्रलोक आहे.
यातील नक्षत्रांची संख्या न मोजता येण्याजोगी आहे.
(१०० समुद्र, १४ अरब, २० कोटी)
-----------
४) बुधलोक -

बुधाचा रथ वायु व अग्निद्रव्याचा बनलेला आहे.
त्याला ८ पिवळे घोडे जुंपलेले आहेत.
------------
५) शुक्राच्या रथाला ८ घोडे आहेत
--------------
६) मंगळाच्या रथाला ८ सोनेरी रंगाचे घोडे जुंपलेले आहेत.
--------------------
७) बृहस्पतीलोक
- येथील सुवर्ण रथाला श्वेत वर्णाचे ८ घोडे आहेत.
------------
८) शनिलोक - रथाला ८ घोडे
---------
९) राहूमंडल हे सूर्यमंडळाच्या खाली आहे.
----------------
शनिमंडळाच्या बाहेर सप्तर्षींचे मंडळ आहे.
------------
सर्वात वर ध्रुवलोक आहे.
सारे ज्योतिर्मण्डल वायुरुपी दोरीने ध्रुवामध्ये बांधलेले आहे.
-----------------------------------------
या सर्व मंडलांना फिरवणारे वायु -
१) प्रवह - हा पृथ्वीबाहेर असून तो ढगांना फिरवतो.
२) आवह - हा सूर्यमंडलाला बांधलेला आहे.
३) उद्वह - हा चंद्रमंडलाला बांधलेला आहे.
४) संवह - हा नक्षत्रमंडलाला फिरवतो.
५) विवह - हा ग्रहमंडलाला फिरवतो.
६) परिवह - हा सप्तर्षिमंडलाला फिरवतो.
७) परावह- हा ध्रुवाला बांधलेला आहे.
------------------------
संदर्भ - स्कंदपुराण, माहेश्वरखंड

॥श्रीराम समर्थ॥