माहेश्वरखंड

माहेश्वरखंड

अष्टदिक्‌पाल व देवता शिवपूजन कोणत्या रंगाच्या लिंगाचं करतात?

ब्रह्मा - मणिमय
इंद्र - रत्नमय (पूर्वदिशा)
चंद्रमा - मुक्तामय (मोति)
सूर्य - ताम्रमय
कुबेर - चांदी (उत्तरदिशा)
वरुण - लाल (पश्चिमदिशा)
यमराज - नील (दक्षिणदिशा)
निऋति - रजत (नैऋत्यदिशा)
वायु - केशरी (वायव्यदिशा)
-----------------------
भगवान शंकराला कोण अधिक प्रिय आहे?
- अभिमानशून्य
- दंभरहित
- अपरिग्रही
---------------
शहाण्या माणसाने न्यायाने मिळवलेल्या धनाचा दहावा भाग ईश्वराची प्रसन्नता मिळवण्यासाठी सत्कर्मासाठी वापरावा.
----------------
शिव-पार्वतीविवाह प्रसंगी हिमवानाने (हिमालयाने) आपल्या जावयाला (श्रीशंकरांना) गोत्र विचारले व आपल्या कुलाचा परिचय द्यायला सांगितला तेव्हा नारदाने वीणा वाजवायला सुरुवात केली व उत्तर दिले की -
- श्रीशंकरांचे गोत्र व कुल "नाद" आहे.
- हे कोणत्याही कुलात उत्पन्न झालेले नाहीत
- यांचा कोणत्याही कुलाशी संबंध नाही.
- महादेव नादामध्ये प्रतिष्ठित असतात आणि नाद त्यांच्यात असतो.
- शिव नादमय आहेत आणि नादाने उपलब्ध होतात.
- यांचे गोत्र स्वतः ब्रह्मा व विष्णूही जाणत नाहीत.
- यांचे कोणतेही रुप नाही
- यांचे कोणते कुल नसल्याने यांना अकुलीन म्हणतात.
- जी कन्या आपण यांना देत आहात तिचेही स्वरुप आपल्याला माहित नाही.
- या दोघे शिव-पार्वतीपासून तर संपूर्ण विश्वाची उत्पत्ति होते.
- सर्व विश्व यांच्या आधारावर टिकून आहे.
--------------------------

॥श्रीराम समर्थ॥