महर्षी व्यास

आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमेबरोबर व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. कृष्णाचे अंशावतार म्हणून कृष्णद्वैपायन, वेदांची पुनर्रचना करणारे म्हणून वेदव्यास, बदरिकाश्रमात तप करणारे व तेथील व्यासगुंफेत महाभारत ग्रंथाची रचना करणारे म्हणून बादरायण व्यास, यमुनेच्या द्वीपात जन्म म्हणून द्वैपायन, पराशर ऋषींचे पुत्र म्हणून पाराशर्य असे हे वैवस्वत मन्वन्तरातील २८वे व्यास.

शांति-मंदिर येथे १९४५पासून परात्पर गुरु म्हणून त्यांची पूजा व स्मरण केले जाते.
व्यासांचे अलौकिक कार्य हे अवतारकार्य होते. त्यांनी कलियुगातील हीन बुध्दीच्या, तेजोहीन, बलहीन, भरकटलेल्या मानवांसाठी करुणेपोटी सनातन धर्माची दिशा दाखवण्याचे काम केले आहे.
व्यास हे सप्त चिरंजीवांपैकी एक आहेत.
व्यास म्हणजे सुसंबध्द विकास असं महर्षी विनोद लिहून गेले आहेत.