२१ स्वर्ग

मेरुगिरीच्या वर तीन शिखरे आहेत, तिथे स्वर्गलोक आहे.
ही शिखरे विविध प्रकारच्या वृक्षांनी व वेलींनी युक्त आहेत व हर तर्‍हेच्या फुलांनी सुशोभित आहेत.
यांच्या मध्ये स्फटिक आणि वैडूर्यमण्यांनी युक्त शिखर आहे.

पूर्वेला इंद्रनीलमय व पश्चिमेला माणकांनी युक्त शिखरे आहेत.
मधल्या शिखरावर "त्रिविष्टप" नावाचा स्वर्ग आहे. यामध्ये आनंदमयी अप्सरा निवास करतात.
मध्यवर्ती शिखरावर आनंद व प्रमोद असतो.
पश्चिम शिखरावर श्वेत, पौष्टिक, उपशोभन आणि काम आणि स्वर्गाचा राजा आल्हाद यांचा निवास असतो.
पूर्व शिखरावर निर्मम, निरहंकार, सौभाग्य आणि अतिनिर्मल नावाचे स्वर्ग आहेत.
मेरु पर्वताच्या टोकावर एकूण २१ स्वर्ग आहेत.

१) आनंद स्वर्ग - निवासी - जे धर्मपालनासाठी पाण्यात प्रविष्ठ होऊन प्राणत्याग करतात (जलसमाधी) ते या स्वर्गाला जातात.
२) प्रमोद स्वर्ग - निवासी - जे धर्मरक्षणासाठी अग्निमध्ये प्रवेश करतात ते या स्वर्गाला जातात.
३) सौख्य स्वर्ग - जे धर्मार्थ पर्वतशिखरावरुन उडी मारून प्राणत्याग करतात ते या स्वर्गाला जातात.
४) निर्मल स्वर्ग - लढाईमध्ये ज्यांना मृत्यू येतो ते या स्वर्गाला जातात.
५) त्रिविष्टिप स्वर्ग - संन्यासावस्थेत ज्यांना मृत्यू येतो ते या स्वर्गात जातात.
६) नाकपृष्ट स्वर्ग - श्रौत यज्ञ करणारे
७) निवृत्ति स्वर्ग - अग्निहोत्री
८) पौष्टिक स्वर्ग - विहिरी व तळी बनवून घेणारे
९) सौभाग्य स्वर्ग - सोने दान करणारा
१०) अप्सरा स्वर्ग - भयंकर थंडीमध्ये जो लाकडे पेटवून अनेकांना उब देतो
११) निरहंकार स्वर्ग - सोने व गाई दान करणारा, विद्यादान करणारा मेधावी
१२) शांतिक स्वर्ग - शुध्द भावाने भूमिदान करणारा
१३) निर्मल स्वर्ग - चांदी दान करणारा, नदीत स्नान करणारा, क्रोधाला जिंकलेला, दृढतापूर्वक व्रताचे पालन करणारा, जीवांच्या हिताविषयी तप्तर असणारा
१४) पुण्याह स्वर्ग - घोडे दान करणारा
१५) मंगल स्वर्ग - कन्यादान करणारा
१६) श्वेत स्वर्ग - ब्राह्मणांना तृप्त करून त्यांना भक्तिपूर्वक वस्त्रे दान करणारा
१७) परमार्थ स्वर्ग - कपिला गाईचे दान करणारा
१८) मन्मथ स्वर्ग - उत्तम बैलाचे दान करणारा
१९) उपशोभन स्वर्ग - माघ महिन्यात नित्य नदीत स्नान करणारा, तीळ-गाय-छत्र-जोडे दान करणारा
२०) स्वर्गराज आल्हाद - देवमंदिरे बांधतो, द्विजांची सेवा करतो, नेहेमी तीर्थयात्रा करतो असा
२१) शुभ स्वर्ग - जो कायम एकचवेळा जेवतो, त्रिरात्री उपवास करतो असा

-----------------------------
दानांचे वर्गीकरण -
अतिदान - कन्या, गाय, भूमि, विद्या
------------------------
स्वर्गाचे १० निर्मल व विशाल मार्ग आहेत. त्यांचे निवासी-

१) कुमार कार्तिकेय
२) मातृका
३) सिध्द-गंधर्व
४) विद्याधर
५) नागराज
६) गरुड
७) पितृगण
८) धर्मराज
९) दक्ष
१०) आदित्य
-------------------------
याच्या बाहेर ग्रह व नक्षत्रमंडळे आहेत. ती या क्रमाने एकाबाहेर एक आहेत.
- सूर्यमंडळ
- चंद्रमंडळ
- नक्षत्रमंडळ
- बुध
- शुक्र
- मंगळ
- गुरु (बृहस्पती)
- शनि
- सप्तर्षी
- ध्रुव

ध्रुव हा सर्व ज्योतिर्मंडलाचा केंद्र आहे.
सूर्य सर्व तीनही लोकांना (भू, भुवः व स्व) प्रकाशित करतो.
तीनही भुवनांचं अधिपत्य श्रीविष्णूच्या देखरेखीखाली इंद्र करतो.
------------------------------------------
संदर्भ - श्रीनरसिंहपुराण (अध्याय ३०, पृष्ठ ९४, ९५, ९६, ९७)

॥श्रीराम समर्थ॥