श्रीअध्यात्म रामायण

प्रस्तावना
भारतीय लोकांनी श्रीरामकथेचा आश्रय करूनच वैयक्तिक आणि सामाजिक संकटांतून मार्ग काढलेला दिसतो.
श्रीमत्‌अध्यात्मरामायण ही मूळ वाल्मिकीरामायणाची अत्यंत सरस, संक्षिप्त आवृत्ती म्हणता येईल.
दैवी आणि मानवी अशा दोन्ही अंगांनी श्रीरामाचे चरित्र सांगितले आहे (वाल्मिकी रामायण).

कर्ता अनाम आहे.
अध्यात्मरामायण हे ‘श्रीराम हा श्रीमहाविष्णूचा वा नारायणाचा अवतार आहे’ या प्रमुख संकल्पनेच्या आधारे लिहिलेले दिसते.
ग्रंथाची मांडणी श्रीशिवपार्वतीच्या संवादातून झालेली आहे.
ग्रंथकर्त्याने मायासीतेची कल्पना मांडली आहे.
विविध व्यक्तींकडून ‘परमात्मतत्त्वाविषयी’ व्यक्त झालेले विचार आहेत.
महाकाव्याचे बहिरंग परिक्षण करण्यापेक्षा अंतरंगदृष्ट्या त्याची महती पटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
हा एक महत्त्वाचा आणि विश्वसनीय ग्रंथ आहे.
श्रीरामाच्या उपासकांना या ग्रंथाने आकर्षित केलेले आहे.
अनेक जागी वाचन लेखन यांनी होणारी फलनिष्पत्ती दिलेली आहे .
श्रीरामगीता’ हे लक्षणीय अंग आहे.
हा मंत्रमय ग्रंथ आहे.
यात संकल्प, न्यास, ध्यान आणि जपविधी यांचा समावेश आहे.

प्रतिश्वासम्‌ सविश्वासम्‌ रामम्‌ वद दिनेदिने।
विश्वास पुन श्वास आगामिष्यति वा न वा । राम – राम ।

प्रत्येक दिवशी विश्वासपूर्वक प्रत्येक श्वासाबरोबर राम म्हणावं पुन्हा श्वास घेता येईल याचा विश्वास कोण देणार?
-------------------------------------
अगदी बाळपणापासून मी रामायण ऐकत वाचत आलेले आहे.

वयात आल्यावर शिंगं फुटल्यावर त्या कथा वाचनातील देवभक्तीचा भाव जाऊन त्याजागी मानवी व्यवहारी पातळीवरुन चिकित्सा मी केलेली होती. त्या कथेत श्रीराम भगवंताचा अवतार होता व त्याने देवांच्या विनंतिवरुन हे अवतार कार्य केले हे मागे पडून त्याच्या वर्तनातील न पटलेले मुद्दे घेऊन मी वादही घातला होता.

मध्यमवयात काही कल्पनातीत बदल माझ्यात घडून येऊन श्रीरामाचेच ध्यान, मनन, पूजन, भक्ती, स्मरण, जप इ. मला करायला सांगितल्यावर माझ्या मनात मोठे द्वंद्वंही आले होते.
श्रीगुरुकृपेने कालांतराने बुध्दीला पटले नाही तरी भगवत्‌भाव ठेऊन भक्ती करायची सवय लागली.
२००४ मध्ये अनुग्रह मिळाल्यावर व महाराजांच्या चरित्राचे वाचन सुरु झाल्यावर माझ्यात लक्षणीय फरक होत गेला.
महाराज श्रीरामहृदयाचे पठण करण्यास सांगत असत. हे वाचून ते रामहृदय कशात आहे याचा शोध मी घेतला. तेव्हा अध्यात्मरामायणाविषयी मला समजले.
मी ताबडतोब हा ग्रंथ मिळवला व वाचायला घेतला.
मी जसाजसा हा ग्रंथ वाचला तसातसा माझ्या चित्तातला मल गेला.
माझ्या सर्व शंकांची उत्तरं मला मिळाली.
मन शांत झालं.
माझ्याकडून रामभक्ती खर्‍या अर्थानं होऊ लागली.

या वेबसाईटवर मी माझ्या चिंतनासाठी काही मुद्दे काढून ठेवले होते ते दिले आहेत.
कथा सर्वच जणांना माहित असते. त्यामागचे गुह्य साधकांना समजावे हा हेतू आहे.
--------------------
॥श्रीरामचंद्राय नम:॥

(संदर्भ - सार्थ श्रीअध्यात्मरामायण, संपादक - डॉ. म.वि. गोखले, प्रकाशक - अनंत सदाशिव वैद्य)

॥श्रीराम समर्थ॥