रामनामाने कुंडलिनी जागृती

Image
रामनामाने कुंडलिनी जागृती -
(संदर्भ- चरित्र पृष्ठ ६४० ते ६४१)
--------------
कुंडलिनी -
मोठी प्रकृती म्हणजे विश्वशक्ती.
ती गोळा होऊन माणसाच्या ठिकाणी वास करते. बहुतेक माणसांमध्ये तिचे तोंड खाली असते, शिवाय ती निजलेली असते.
अनुग्रहाचा परिणाम - सद्‌गुरुकडून नाम घेतले म्हणजे ती जागी होते व तिचे तोंड वरच्या दिशेला होते. सत्संगाने व नुसत्या नामस्मरणानेदेखील ती जागी होऊन तिचे तोंड वर होते.
कुंडलिनीचे आरोहण – वर जाणे.
पहिली पायरी -
या वेळी माणूस संतदर्शने घेतो, संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करतो, संतकृपा व्हावी म्हणून प्रार्थना करतो आणि नियमाने नामस्मरण करतो.

दुसरी पायरी -
ही शक्ती बेंबीपाशी असते. माणसाची वासना बेंबीपाशी वास करते. तेथे कुंडलिनी येऊन स्थिर झाली म्हणजे माणसाची वासनाच बदलते. इंद्रियांचे भोग भोगण्याची लालसा नकळत क्षीण होते. नामाला जीवन वाहावे अशी उत्कट इच्छा होते. आतील संघर्षाचा कमीजास्त तीव्र अनुभव येतो. गतायुष्याबद्दल पश्चात्ताप होतो. पण येथे जीवनाचे खरेध्येय निश्चित होते.
येथे पोचल्यावर काही लोकांना काव्य सुचते, नवीन कल्पना सुचतात, वाक्‌चातुर्य प्राप्त होते. [कुंडलिनी जागृतीचा पहिला टप्पा]

तिसरी पायरी -
येथे न थांबता साधकाने चिकाटीने नामस्मरण चालू ठेवले तर कुंडलिनी हृदयापर्यंत पोचते. तेथे एकीकडे आपल्या आराध्य दैवताचे सान्निध्य लाभते आणि दुसरीकडे जागेपणचा सबंध काळ नामाचे स्मरण टिकते. कधीकधी नामस्मरणातून दिव्य नाद ऐकू येतो. आराध्यदैवताच्या किंवा सद्‌गुरुंच्या मनोमय सान्निध्यातून त्यांच्याबद्दल नि:स्वार्थी प्रेम उदय पावते.

चवथी पायरी -
हृदयातून कुंडलिनी कंठात जाते. तेथे स्वप्नामध्ये व गाढ झोपेमध्ये नाम चालते. येथे किती वेळतरी मानसपूजा चालते.

पाचवी पायरी -
कुंडलिनी दोन्ही भुवयांच्यामध्ये पोचते. तेथे ईश्वराचे सगुणदर्शन घडते. [कुंडलिनीचा दुसरा टप्पा]
कसोटी - येथे स्थिरावणे कठिण असते. लौकिकाची, सिद्धींची, श्रेष्ठपणाच्या कल्पनांची आकर्षणे विघ्ने आणून साधकाचे पाय खाली ओढतात.
संरक्षण – साधकाला श्रीसद्‌गुरुंचे संरक्षण लाभते.

सहावी पायरी -
येथपर्यंत फार थोडे जण येतात. साधक संपूर्ण शरणागत होऊन जातो. काही काळ तो भानावर असत नाही. पण मग देहावर योऊन अनेक जणांना नामाला लावतो.
॥श्रीराम समर्थ॥

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2019. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search