महाराजांनी जपलेले/दिलेले नाम

Image
महाराजांनी जपलेले/दिलेले नाम

जो मंत्र महाराजांना त्यांच्या सद्‌गुरुंनी दिला, व त्यांनी लाखोजणांना दिला.
तो त्रयोदशाक्षरी मंत्र म्हणून ओळखला जातो

जो सिध्दमंत्र आहे
ज्याचा निष्काम भावनेने १३ कोटी चा यथाशास्त्र जप केला असता जन्म-मरणाच्या फेर्‍यातून सुटका होते, ज्याला महाराज "रामाने कल्याण केले" असे म्हणत
------------
हा मंत्र गोंदवल्याला सकाळी ९=३० ते ११=०० या वेळात गेला असता महाराजांच्या समाधीपाशी त्यांच्या पादुकांवर मिळू शकतो.
तसेच तो सज्जनगडावर श्रीरामदासस्वामींच्या समाधीपाशी मिळू शकतो.
------------
मंत्र घेण्यासाठी सद्‍गुरुच साधकाला पाचारण करतात.
आपली पुरेशी चित्तशुध्दी की महाराज आपल्याला बोलावतात.
कोणाच्या भिडेखातर, नाईलाजानं, दबावाखाली मंत्र घेऊ नये.
मंत्र घेण्यापूर्वी सद्‌गुरूंच्या अर्चनेसाठी नारळ, फुले/हार, नैवेद्यासाठी पेढे, एक नवी माळ इ. न्यावे.
एकदा मंत्र घेतला असता - एकच गुरु, एकच मंत्र, एकच देव अशा पध्दतीने साधना करणे अपेक्षित असते.
ग्रहणात, पर्वकाळात जप करण्याने मंत्राला मालिन्य येत नाही, उलट तो सिध्द होत जातो.
  •  एकच माळ असावी. (शक्यतो अस्सल तुळशीची)
  •  गुरुप्रतिमेच्या सान्निध्यात जप करावा. इतरवेळी नामस्मरण करावे.
  •  महाराज आपल्या प्रवचनांतून सांगतात त्याप्रमाणे जप केले असता, सद्‌गुरुंची आपल्यावर कृपा होते.
॥श्रीराम समर्थ॥

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2019. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search