तीर्थयात्रा

१९९५ ते २००० पर्यंत मी निसर्गनिरीक्षणासाठी जंगलातून, पाणवठ्यांवर फिरत होते. निसर्गातली परमेश्वरी माया बघत होते. सन २००४ मे पासून मार्च २००६ पर्यंत मी गुरुशोधासाठी फिरत होते. माझ्या धार्मिक यात्रा मी महाराजांचा अनुग्रह घेतल्यावर त्यांच्या कृपेनेच सुरु झाल्या.

तीर्थयात्रा
(संदर्भ - भारतीय तीर्थक्षेत्रे, लेखक - गजानन खोले, इंद्रायणी साहित्य प्रकाशन)
नृणां पापकृतां तीर्थे पापस्य क्षमनं भवेत्‌ ।
यथोक्तफलदं तीर्थं भवेत्‌ शुद्धात्मनां नृणाम्‌ ॥

तीर्थांचे प्रकार

सप्ततीर्थे - स्कंदपुराण
१) सत्य,
२) क्षमा,
३) इंद्रियसंयम,
४) दया,
५) प्रियवचन,
६) ज्ञान,
७) तप

क्षेत्रोपाध्याय
---------------
क्षेत्र - पवित्र स्थान
उपाध्याय - क्षेत्राच्या ठिकाणी राहून, येथील पाठशाळेत शिकून तयार झालेले व येथील मुख्य धार्मिक स्थानांच्या देवतांची विधीपूर्वक अर्चना करणारे गुरुजी

भारतवर्षातील प्रमुख तीर्थक्षेत्रे

१) कुंभमेळ्याची क्षेत्रे -

अ) प्रयाग (अलाहाबाद),
ब) हरिद्वार (हरद्वार, मायापुरी, कनखलक्षेत्र),
क) नासिक (नाशिक),
ड) उज्जैनी (उज्जैन, उज्जयिनी, अवंती)

बारा ज्योतिर्लिंगे

सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम्‌ ।
उज्जयिन्यां महाकालम्‌ ॐकार ममलेश्वरम्‌ ॥
परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम्‌ ।

श्रीरामेश्वरम्‌ - सन २००६ मध्ये नाताळच्या सुटीदरम्यान एक छोटी यात्रा श्रीगुरुनाथ ट्रॅव्हल्सने आयोजित केलेली होती. त्यात मदुराई, श्रीरामेश्वरम्‌ व कन्याकुमारी ही तीर्थे समाविष्ट केलेली होती. मी पर्वणी साधली. माझ्याकडे काशीचे व हरिद्वारचे गंगाजल होतेच. काशी-रामेश्वरम्‌-काशी अशी यात्रा करण्याची संधी पुन्हा येणार नव्हती.

कोणतेही पुराण घ्या, पौराणिक कथांचं पुस्तक घ्या, त्यात राजा विक्रमादित्य, अवंतीनगरी, उज्जैन इ संदर्भ सापडणारच. मला वाटायचं की सगळं कल्पित आहे. पण नाही हो! कलियुग ५११० वर्षांपूर्वी चालू झाले तेव्हा राजा युधिष्ठिराचा शक चालू झाला. तो संपल्यानंतर आर्यावर्तात (उत्तर हिंदुस्थानात) राजा विक्रमादित्याचा शक सुरु झाला.
त्याची राजधानी अवंती/उज्जैन नगरी.

मोक्षपुर्‍यांचे माझे अनुभव
------------
१) हरिद्वार/हरद्वार
- फारफार वर्षांपासून इथे जाण्याची माझी इच्छा होती. सन २००६ मध्ये उन्हाळ्यात गुरुनाथ ट्रॅव्हल्सबरोबर मी जेव्हा दोन धाम (हिमालयातले) यात्रा केली, जी माझी पहिलीच यात्रा होती, तेव्हा जातायेता हरिद्वारला दोन वेळा मुक्काम करण्याचा योग आला.

जानेवारी २०१० - श्रीजगन्नाथरथयात्रा दरवर्षी टी.व्ही वर पाहून विशेषतः श्रीजगन्नाथाचे ते अनुपमेय रुप पाहून, माझ्या मनात त्याला भेटावे, असे कित्येक वर्षे घाटत होते.

उज्जैनला घेतलेल्या श्रीचैतन्यमहाप्रभूंचे चरित्र मी वाचले होते.त्यात मी असे वाचले होते की शेवटची काही वर्षे महाप्रभू पुरीलाच मुक्कामी होते.

द्वारका -
----
नोव्हेंबर २००८ मध्ये माझे मधले दीर श्री. उदयन, माझी नणंद सौ. अदिती, व अभ्यंकर कुटुंबीय असे आम्ही ६ जण गुजराथमधील मातृगया (सिध्दपूर), श्रीसोमनाथ व द्वारका या यात्रेला गेलो होतो.

निमित्त होते माझ्या स्वर्गीय सासूबाईंची - कै. मैत्रेयी विनोदांची जन्मशताब्दी.

श्रीगंगासागर यात्रा
श्रीगंगासागर हे क्षेत्र कलकत्यापासून १४४ कि.मी. आहे. येथे गंगानदी अनेक मुखांनी पूर्वेला बंगालच्या उपसागराला मिळते.हा त्रिभुज प्रदेश १५० किलोमीटर्सचा आहे.मात्र जेथे हुगळी नदीचा जो भाग कपिल मुनीच्या आश्रमापाशी सागराला मिळतो त्या भागाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याने श्रीगंगासागर म्हणतात.

अयोध्या
--------------
श्रीराम हे आराध्यदैवत झाल्यापासून सतत विविध प्रकारच्या कवींनी लिहिलेली रामायणे (वाल्मिकीरामायण, अध्यात्मरामायण, भावार्थरामायण, श्रीरामविजय, योगवासिष्ठ्य, तुलसीरामायण) मी वाचतच होते.
शिवाय महाराजांच्या चरित्रात अनेकवेळेला अयोध्येचा उल्लेख आलेला आहे.
- महाराज कितीतरी वेळेला इथे आले होते.

नामाचे महात्म्य -
प्र + याग (यज्‌ = यज्ञ) = मोठा यज्ञ.
ब्रह्म्याच्या ५ यज्ञवेदीं पैकी प्रयाग ही मध्यवेदी आहे.
-----------------
तीर्थाचे वैशिष्ठ्य -

गंगा (शुभ्र व वेगवान), यमुना (कृष्ण रंगाची व संथ) व सरस्वती (गुप्त) यांचा पवित्र नद्यांचा संगम येथे झाला आहे.

गोकर्ण महाबळेश्वर तीर्थमाहात्म्य -

- त्रेतायुगाआधीपासून महत्व - या भागाचे नाव रुद्रयोनी असे आहे. भूमीच्या कर्णातून रुद्र बाहेर पडला म्हणून हे स्थान गोकर्ण. येथे आदिगोकर्ण नावाने अतिप्राचीन शिवलिंग आहे.
- जगत्‌प्रलयात हा भूभाग फक्त पाण्याच्या वर राहतो..इतके याचे महत्व आहे.
- रावणाला श्रीशंकराने त्याच्या आईला उपासनेसाठी दिलेल्या आत्मलिंगाचे दर्शन होते