डॉ. ऋजुता विनोद इ-बुक्स

पिंड जिज्ञासा

इच्छांचा जन्म आपल्या नियंत्रणाखाली नाही, इच्छांचं स्वरूप आणि गुणधर्म आपल्या हातात नाही, इच्छा पूर्ण व्हाव्यात ह्यासाठी करावे लागणारे प्रयत्न एका मर्यादेपर्यंत आपल्या हातात असतात, इच्छांचं पूर्ण होणं आपल्या हातात नसतं. म्हणजे याचा अर्थ असा की माझ्या मर्यादित गुणवत्तेप्रमाणे माझे मर्यादित प्रयत्न एवढंच माझ्या हाती असावं की काय? बाकी काहीच माझ्या नियंत्रणाखाली नाही!

सद्‌गुरुकृपा

मी कित्येको जन्म विविध योनींमधून फिरत होते, तेव्हा संसाराच्या मोहजालात अडकलेली होते. मीच "मी-मला-माझे", हवे/नको या अनंत इच्छा-आकांक्षा-हव्यास यात गुंतवून घेतले होते. माणसे-वस्तू यांच्या मोहाने मी फरफटली जात होते. तात्पुरती-ओढ याने मी हो-नाहीच्या द्वंव्दात अडकलेली होते. आशा-निराशा, चिंता, सुख-दुःख यानं मला घेरलं होतं.

या पुस्तकात चारही युगांची वर्णने आहेत. आजच्या कलियुगापेक्षा किती वेगळे जग आधीच्या युगांमध्ये होते ते यावरून समजते. त्यावरून रामायण-महाभारतातील महान व्यक्ती व त्यांच्या चरित्राचे संदर्भ आजच्या युगातील संदर्भाप्रमाणे लावले तर सामान्य माणसाचा कसा बुध्दीभेद होतो ते लक्षात येते.

सनातन काळगणना

सध्याचा काल हे कलियुग मोठे बुचकळ्यात पाडणारे मला दिसले! भल्याभल्यांनांसह मलाही प्रश्न पडला होता की आपले काय होणार? या जगाचे काय होणार? हे जग कुठे चाललंय? पुढे काय वाढून ठेवलंय? मी घेतलेल्या शोधानं मला समाधान झालं.

सगुण पूजेचे महत्व (E-Book)जो पर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत भगवंताच्या सगुण रुपाची अर्चना व निर्गुणाविषयीचे वाचन, चिंतन व मनन करावे. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर सुध्दा सगुण रुपाची अर्चना चालू ठेवावी, असे श्रीगोंदवलेकरमहाराजांनी सांगितले आहे.