इ-बुक्स

महाराजांविषयीचे लेखन -
1) महाराजांचे चरित्र -
- महाराजांच्या चरित्रातून मी काय शिकले?
- महाराजांचे सद्‌गुरू श्रीतुकामाई

२) महाराजांनी दिलेली प्रवचने -
- महाराजांच्या प्रवचनांतील "भगवंत"
- महाराजांच्या प्रवचनांतील "नाम व अखंड नामस्मरण"
- महाराजांच्या प्रवचनांतील "सद्‌गुरू"
- महाराजांच्या प्रवचनांतील "संत-सत्पुरुष"
- महाराजांच्या प्रवचनांतील "प्रपंच"
- महाराजांच्या प्रवचनांतील "साधन"
- महाराजांच्या प्रवचनांतील "परमार्थ"
- महाराजांच्या प्रवचनांतील "आनंद व समाधान"

३) महाराजांनी केलेले लेखन -
- महाराजनिर्दिष्ट स्फुट लेखन
- महाराजांनी पाठवलेल्या पत्रांचे सार

कितीवेळा मी बेलसरेबाबांनी लिहिलेले महाराजांचे चरित्र वाचले असेल कोण जाणे! प्रत्येकवेळेला मी नवीन नवीन शिकत गेले. त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घेत गेले. त्यांच्याविषयी वाटणार्‍या प्रेमामध्ये व आदरामध्ये सतत भर पडत गेली. तरीही महाराज मला कळले असे मी कल्पनेत सुध्दा म्हणणार नाही. त्यांचे चरित्र खूप खोल, विशाल आणि अतर्क्य आहे. सर्वसामान्य माणसाला संताचे मन कळणे शक्य नाही. मला तर माझा खुजेपणा, संकुचितपणा आणि देहबुध्दीचा खोटा स्वार्थीपणा नेहेमीच खटकतो. संताची निर्भयता, मनाची उत्तुंग उंची, प्रशांत विशालता, क्षमाशीलता, परमात्म्याशी असलेली तादात्म्यता मला कशी कळणार?

प.पू. गुरुबंधू कै. श्री. बेलसरेबाबा यांनी लिहिलेले महाराजांचे चरित्र म्हणजे माझी गीता आहे. उलटसुलट कसेही वाचले, कधीही वाचले तरी ते मन व्यापून टाकते. ते मधुरमिठास आहे. ते तत्वगंभीर आहे. तत्काळ मार्गदर्शन करणारे दीपस्तंभसमान ते आहे. ग्रंथाच्या दुसर्‍या भागात जवळजवळ अर्धे पुस्तक व्यापेल इतका मजकूर साधकांसाठी केलेल्या नेमक्या मार्गदर्शनाचा आहे. सहज फिरायला जावे आणि येताना वाटेत प्राजक्ताची ताजी सुगंधी फुले विखुरलेली दिसावीत असे मला ही १० स्फुट प्रकरणे वाचून वाटले. मी त्याचा सारांश या इ-पुस्तिकेत दिलेला आहे.

This e-book is for sell. To purchase it please click on

माझे सद्‌गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकरमहाराजांचे सद्‌गुरु कोण होते? ते कसे होते? त्यांनी महाराजांना सत्शिष्य म्हणून कसं वागवलं? त्यांच्या कशा कसोट्या घेतल्या? महाराजांनी गुरुसेवा कशी केली? महाराजांवर गुरुकृपा कशी झाली? माझ्या आजेगुरुंनी महाराजांना कोणता आदेश दिला? इ. मला जिज्ञासा होती.

आपल्या साधकांना काही प्रापंचिक अथवा पारमार्थिक अथवा व्यावहारिक अडचणी आल्या तर महाराज त्यांना पत्रे पाठवून मार्गदर्शन करीत असत. ही पत्रे ते कोणाकडून तरी लिहवून घेत असत. या पत्रांतील त्यांचे अचूक दिशादर्शन आपल्याला आजही लागू पडणारे आहे कारण तपशील बदलला तरी प्रापंचिक वा पारमार्थिक प्रश्नांचे ढोबळ स्वरूप तसेच राहते. त्याकाळची त्यांची परिभाषा समजून घ्यायला मला सुरुवातीला वेळ लागला, म्हणून मी या पत्रांतून ते आपल्याला काय सांगू इच्छितात याचे मुद्दे काढून ठेवले होते. ते येथे पुस्तिकारूपाने देत आहे.
This e-book is for sell. To purchase it please click on

भगवंताविषयी आपल्या मनात प्रेम असावे. भीती नसावी. परमेश्वर दयेचा सागर आहे. आपल्याला दुःख व्हावे असे त्याला कधीही वाटत नाही. आपण भगवंतमाउलीला मनापासून हाक मारावी. आपण भगवंताचे नाम मनापासून घ्य़ावे. रामाजवळ जाऊन रामाचे प्रेम मागावे. कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नये. नाम भगवंताला अत्यंत जवळचे आहे. त्या नामाची संगत धरावी. नामाचा सतत सहवास ठेवावा. त्याला प्राणापलिकडे जपावे. नामात दंग होऊन स्वतःला विसरावं. ऑक्टोबर व नोव्हेंबरच्या मिळून ६१ प्रवचनांत महाराज आपल्याला भगवंताच्या प्राप्तीचे रहस्य सांगताहेत.

१२ महिन्यांपैकी जानेवारी, फेब्रूवारी, डिसेंबर व सप्टेंबर या महिन्यातील दिवसांची प्रवचने नामाला वाहिलेली आहेत. ती एकत्रित वाचली असता सर्वच सार हाती लागून साधना तीव्र व्हायला मदत होऊ शकेल असे मला वाटले. यातील चित्रे माझ्या मूळ हस्तचित्रांवरून नूतन यांनी तयार केलेली आहेत.

प्रवचनांच्या पुस्तकामध्ये महाराजांची निरुपणे, पत्रे, वाणीरुपातील मार्गदर्शन साधकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. या मूळ ग्रंथाचे महत्व आहेच. त्यात घरगुती बोली भाषा आहे, रोजच्या व्यवहारातली उदाहरणे आहेत. महाराजांचा असा खास टच आहे.
महाराजांच्या प्रेरणेमुळेच मला हे करण्याची बुध्दी झाली. "नेमके मी काय करायचे?" हे अगदी कमी वेळात माझ्या लक्षात यावे या दृष्टीने मी मागेच मुद्दे काढून ठेवलेले होते. त्यांचा उपयोग या इ-पुस्तिकेत केलेला आहे.
या इ-पुस्तिकेत "प्रपंच" या विषयावरची निरुपणे साररुपाने संकलित केलेली आहेत.

महाराज साधकांना सांगताहेत की - भगवंताला अनन्यशरण जावे. "रामा, तुझ्यावाचून माझी यातून सुटका नाही. तू ठेवशील त्यात मी आनंद मानीन. तुझे प्रेम मला लागू देत" असे कळकळीने रामाला सांगावे. आणि सदैव त्याचे नाम हृदयात ठेवावे. महाराजांचे आश्वासन आहे की तो उदार परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही.

परमार्थ म्हटलं की कानाडोळा करणं-दुर्लक्ष करणं अशात सध्याच्या माणसांचं आयुष्य निघून जातं. मनुष्याच्या आयुष्यातून परमार्थ काढून टाकला की त्याचा फक्त मनुष्यप्राणी होतो - आहारनिद्राभयमैथुन करणारा एके दिवशी इतरांप्रमाणे मरून जाणारा. प्रसंगवशात्‌ परमार्थाकडे वळलेली माणसं खरोखर परमार्थ समजून करतात का हा एक प्रश्नच असतो. वासनेच्या चिखलात डुकरासारखं लोळताना बघून महाराजांसारख्या संतांना आपली दया येते. "अरे तुझा जन्म या अज्ञानात जगून वाया घालवण्यासाठी नाही. तू मूळचा आनंदरूप आहेस, ज्या देहाला तू इतकं सजवतोस ते तुझं या जन्मात घालायला दिलेलं टरफल आहे. या देहात आत खरा तू आहेस.

गुरु अनेक असतात. काहीही शिकायचे म्हणले तरी शिकवणारा, मार्गदर्शन करणारा लागतोच. अध्यात्मात गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. जो अध्यात्माकडे जायला प्रवृत्त करतो तो दीक्षा गुरु आणि जो सिध्दमंत्र देऊन आपल्या मोक्षाची हमी आपल्याला देतो तो आपला मोक्षगुरु. मोक्षगुरु हा माणसाचा देह धारण केलेला किंवा समाधीरुपाने जागृत असलेला परमात्माच असतो. आपली तयारी झाली की आपला मोक्षगुरु आपण होऊन आपल्याजवळ येतो व आपला स्वीकार करतो. आपण संपूर्ण शरण गेल्यावर आपल्या आध्यात्मिक प्रगतीची काळजी तो करतो. आपण फक्त संपूर्ण आज्ञापालन करणे बाकी राहते.

संतांना सत्याचे ज्ञान झालेले असते, ते सर्वज्ञ असतात. ते सत्याला धरून राहतात. ते सर्वसामान्य माणसाला मार्ग दाखवायला तयार असतात. ते "राम कर्ता" या भावनेने प्रचंड कर्म करतात. जे दिसतही नाही. ते साक्षित्वाने राहून जगापासून अलिप्त राहतात. कर्म करूनही ते अलिप्त असतात. त्यांचे अंतःकरण शुध्द असते. त्यांची शिव्यांची भाषाही न बोचणारी किंवा आशीर्वादरूप असते. संत विद्वान नसतात. देह सोडल्यावरही त्यांचे अस्तित्व लोकांना जाणवते. संत हे आईसारखे असतात. ते आपल्याला भगवंताची आठवण करून देण्याचे काम करतात. सर्व संतांचे जगावर उपकार आहेत. त्यांनी भगवंताला सगुणात आणले.

जगापाशी समाधान नाही, महाराजांपाशी ते आहे. समाधान कशात आणि कुठे आहे याचा त्यांनी शोध लावला. ते समाधानरूप आहेत. ज्यांच्या घरात समाधान असते, तिथे ते असतात. जो त्यांचा शिष्य समाधानी नाही तिथे रहायला त्यांना कष्ट होतात. ते अत्यंत समाधानी आहेत. अशा आनंदमय व समाधानी महाराजांनी आपल्याला समाधानाचा मार्ग दाखवला आहे.