श्रीसद्‌गुरु ब्रह्मचैतन्य महाराजांचे पुण्यपावन दर्शन

सद्गुरूंचे स्तवन

medium_aarti thali.jpg

जय जय आरती श्रीगुरूराया, सद्गुरूराया
नमितो तव पदी संहरी माया
मी जीव हा भ्रम द्वैतपसारा, द्वैतपसारा
वारूनी दिधला अद्वैतसारा ॥धृ॥

महाराजांवरचे लेखन व फोटो वेगळ्या लिंकखाली द्यायचे ठरवले, त्यामुळे पेजेस लावणे सोपे जाईल असे वाटले.
या लिंकखाली महाराज संदर्भात फोटोंचे अल्बम दिले आहेत.
१) मुखदर्शन फोटो - दिवस रात्र कधीही केव्हाही आपल्या सद्‌गुरुंचं दर्शन साधकाच्या मनाला उल्हास देतं, धीर देतं, शांत करतं. सद्‌गुरुंच्या डोळ्यांतील प्रेम करुणा आशीर्वादमय असते.

रोज सुप्रभाती ज्यांचं दर्शन घ्यावं, ते महाराज.

॥श्रीराम समर्थ॥

या स्लाईडशोमध्ये महाराजांचे फोटो गुगलवरील पिकासामधील पिकनिक वापरून सुंदर केले आहेत. मुळचे महाराजांचे तेज यात अधिक खुलून दिसते आहे. हे काम करताना मी तहानभूक विसरून गेले होते. मला मिळालेला आनंद लुटावासा वाटला.

या लिंकमध्ये श्रीक्षेत्र गोंदवले येथे मिळालेल्या दैनंदिनीची पाने स्कॅन केलेली आहेत व त्या ३२ पानांचा एक अल्बम बनविला आहे. प्रत्येक पानावर साधकांच्या चिंतनासाठी महाराजांचे उपदेशाचे एक वाक्य दिलेले आहे व दुर्मिळ असा फोटो दिलेला आहे.

अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सद्‌गुरु श्रीब्रह्मचैतन्यमहाराजकी जय।
सब संतनकी जय ।
जय जय रघुवीर समर्थ ।
हरि ॐ तत्‌ सत्‌ |
॥श्रीराम समर्थ॥

॥श्रीराम समर्थ॥

या स्लाईडशोमध्ये माझ्याकडे उपलब्ध असलेल्या फोटोंचे संकलन आहे. त्यात समाधिमंदिर, महाराजांच्या पादुका, श्रीगोपालकृष्ण, थोरले रामदरबार, धाकलेरामदरबार, एकमुखी दत्तमहाराज, श्रीशनिदेव यांचे फोटो आहेत.

महाराजांचा अंतरंगातील व प्रसिध्द शिष्यपरिवार -

महाराजांचे ३०-४० वर्षे भारतभर भ्रमण झाले. प्रत्येक वेळी त्यांचे वय, आत्मस्थिती, लोकसंग्रह, नाव वेगळे होते. विविध प्रांतातील हर तर्‍हेच्या अगणित लोकांना त्यांनी सन्मार्गाला लावले. त्यातील फारच थोडे माहित आहेत.
येथे या थोर शिष्यांविषयी वाचल्यानंतर त्यांच्यातील कोणते वैशिष्ठ्य मला भावले तेवढे देण्याचा प्रयत्न केला आहे.
हा एक स्लाईडशो केला आहे - त्यातील प्रमुख शिष्यांच्या उपलब्ध फोटोंचा -

श्री तात्यासाहेब केतकर

श्रीमहाराज सन १८४५ मध्ये श्रीमारुतिरायाचे अंशावतार म्हणून आले व त्यांनी ६९ वर्षे देहात राहून आपले अवतारकार्य केले.

सन १९२५ मध्ये पुन्हा प.पू. श्रीतात्यासाहेब केतकर यांना सर्व दृष्टीने अत्यंत योग्य असे माध्यम समजून व पात्र समजून ते त्यांच्या मुखातून प्रकट झाले. तेव्हापासून ते १९६७ पर्यंत महाराजांनी वाणीरुपाने पुन्हा अवतारकार्य केले.